indian players arrived mohali for first t20 match against australia SAKAL
फोटोग्राफी

IND vs AUS: बुमराहसोबत पत्नी संजना पहिल्या T20 सामन्यासाठी मोहालीत दाखल - Photo

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेला 20 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे.

Kiran Mahanavar

India vs Australia First T-20 Mohali : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेला 20 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ मोहालीला पोहोचले आहेत. ऑस्ट्रेलियन संघ आधीच मोहालीत पोहोचला आणि सराव करत आहे. आता टीम इंडियाही इथे पोहोचली आहे.

भारतातील बहुतांश खेळाडू मास्क घालूनच तेथे पोहोचले आहे. कारण कोरोनाचा धोका अजूनही कायम आहे. या मालिकेतून भारतीय संघात पुनरागमन करणारा जसप्रीत बुमराह पत्नी संजना गणेशनसोबत मोहालीला पोहोचला आहे, तर उर्वरित खेळाडूंचे कुटुंब त्यांच्यासोबत नव्हते.

संघाचा कर्णधार रोहित शर्मा सर्वात पुढे होता. बाकीचे संघ त्याच्या पाठोपाठ स्टेडियमवर पोहोचला. रोहितसाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे. आशिया कपमध्ये खेळल्यानंतर रोहित या मालिकेत मोठी खेळी खेळून लयीत परतण्याचा प्रयत्न करेल.
अफगाणिस्तानविरुद्ध शतक झळकावणारा विराट कोहलीही मोहालीत पोहोचला आहे. आता कोहली ऑस्ट्रेलियासारख्या मोठ्या संघाविरुद्ध मोठी धावसंख्या करण्याचा प्रयत्न करेल. आशिया चषकात मोठी खेळी खेळल्यानंतर विराट लयीत परतला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली खेळी खेळल्यावर त्याचा आत्मविश्वास उंचावला जाईल.
टीम इंडियाचा उपकर्णधार लोकेश राहुलही मोहालीला पोहोचला आहे. त्याच्यासाठी ही मालिका सर्वात महत्त्वाची आहे. दुखापतीतून परतल्यानंतर राहुलने फक्त एकच चांगली खेळी खेळली आहे.
भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याही मोहालीला पोहोचला आहे. हार्दिक हा टी-२० विश्वचषकापूर्वी भारतातील महत्त्वाचा खेळाडू आहे. IPL 2022 पासून हार्दिक फॉर्ममध्ये आहे आणि त्याने भारतासाठी अनेक सामने जिंकले आहेत.
भारताचा लेगस्पिन गोलंदाज युझवेंद्र चहलही मोहालीत पोहोचला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farm Loan Waiver: कर्जमाफीचा पहिला हप्ता अखेर वितरीत, नवीन कर्ज लगेच मिळणार का? मुख्यमंत्र्यांनी सगळंच सांगितलं!

Vaibhav Sooryavanshi: भारताच्या कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी वैभव सूर्यवंशी सज्ज; नागपूरात पोहोचला... कोणाची मदत घेतोय?

Abhijeet Dipke: सरकारची अमेरिकन कंपनीच्या मदतीने दिपकेवर पाळत? वैयक्तिक माहिती प्रदर्शित केली?

Marathi News Live Updates : पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात; भरधाव वाहन दोन वेळा पलटी

Palghar News: पोषण आहाराला कात्री, डहाणूतील ३५ आश्रमशाळांमध्ये चपातीचा पुरवठा बंद

SCROLL FOR NEXT