IPL Schedule 2022
IPL Schedule 2022  
फोटोग्राफी

IPL Schedule 2022 : साखळी सामन्याचे संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

Kiran Mahanavar

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. चाहत्यांची खूप दिवसांची वाट आता संपली आहे. IPL 2022 ची सुरुवात 26 मार्चपासून होणार आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात मुंबईमध्ये होणार आहे. जो संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाईल.

आयपीएल मध्ये 10 संघांचा समावेश आहे. गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे असे संघ आहेत की प्रथमच आयपीएलमध्ये खेळणार आहेत.
चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, पंजाब किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैदराबाद हे आधीच आयपीएलचा भाग आहेत.
आयपीएलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. आयपीएलच्या दहा संघांची 2 गटात विभागणी करण्यात आली आहे. गट पाच-पाचमध्ये विभागले गेले आहेत, त्यामुळे प्रत्येक संघ त्यांच्या गटातील इतर चार संघांविरुद्ध दोन सामने खेळेल. तर प्रत्येकी एक सामना दुसऱ्या गटातील संघासोबत खेळवला जाईल.
आयपीएल 2022 फक्त दोन शहरांमध्ये पूर्ण होईल. हे सर्व सामने मुंबई आणि पुण्यात होणार आहेत. मुंबईतील वानखेडे, सीसीआय आणि डीवाय पाटील स्टेडियम या तीन स्टेडियममध्ये एकूण 55 सामने होणार आहेत. तर 15 सामने पुण्यातील एमसीए स्टेडियमवर होणार आहेत.
आयपीएलमध्ये सहभागी झालेले सर्व खेळाडू भारतात पोहोचू लागले आहेत. खेळाडूंना काही दिवस क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार आहे. त्यानंतर १५ मार्चपासून सर्व संघ आपापल्या सरावाला सुरुवात करतील. त्यासाठी मुंबईत विविध ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
IPL 2022 मध्ये एकूण 12 डबल हेडर असतील, म्हणजेच 12 दिवस असतील ज्यामध्ये 2-2 सामने खेळले जातील. यामध्ये पहिला सामना दुपारी 3.30 वाजता सुरू होईल, तर संध्याकाळचा सामना सायंकाळी 7.30 वाजता सुरू होईल.
आयपीएल मेगा लिलाव झाला. ज्यामध्ये 200 हून अधिक खेळाडूंवर बोली लागली. IPL 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये, इशान किशन हा सर्वात महागडा खेळाडू ठरला, ज्याला मुंबई इंडियन्सने 15.25 कोटी रुपयांना विकत घेतले. तर चेन्नई सुपर किंग्सने दीपक चहरला 14 कोटींना खरेदी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT