INS Vela submarine esakal
मुंबई : आयएनएस व्हेला, चौथी स्काॅर्पियन श्रेणीच्या पाणबुडी मुंबईत नौसेनेच्या डाॅकयार्डमध्ये नौसेना प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंह यांच्या उपस्थितीत नौसेनेत आज गुरुवारी (ता.२५) दाखल झाली.(INS Vela submarine)
या प्रसंगी बोलताना नौसेना प्रमुख सिंह म्हणाले, आयएनएस व्हेलामध्ये पाणबुडी संचालन करण्याचे पूर्ण स्पेक्ट्रमला सुरु करण्याची क्षमता आहे. आम्ही चीन आणि पाकिस्तान संबंधांवर नजर ठेवून आहोत. चीनकडून बरेच शस्त्र पाकिस्तानला निर्यात होत आहेत. यामुळे प्रादेशिक सुरक्षेवर बराच परिणाम होईल. यासाठी आपल्याला तयार राहवे लागेल, असा इशारा त्यांनी दिला. माझ्या कालखंडात कोविड हा सर्वात मोठे आव्हान होते.त्यावेळी सीमावर्ती भागात तणाव होता. त्यामुळे आव्हान आणखी कठीण झाली.जहाजांमध्ये शारीरिक अंतर राखणे शक्य नव्हते. मात्र आम्ही सर्वांशी लढा देत होतो, असे सिंह यांनी सांगितले. आजच्या गुंतागुंतीची सुरक्षा स्थिती पाहता, तिची क्षमता आणि मारक क्षमता भारताच्या सागरीय सुरक्षेसाठी नौसेनेची क्षमता वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असे नौसेना प्रमुख सिंह यांनी सांगितले.आयएनएस व्हेला पाणबुडीब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.