GUJARAT FESTIVALS 
फोटोग्राफी

उत्तरायण - गुजरातमधील आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव

साबरमती नदीच्या किनारी आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव होत असतो.

तेजस भागवत

दरवर्षी गुजरातमध्ये 200 हून अधिक सण साजरे केले जातात. आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव हा सर्वात मोठ्या उत्सवांपैकी एक आहे. काही महिन्यांपूर्वी, गुजरातमधील नागरीक सणासाठी पतंग तयार करण्यास सुरवात करतात. उत्तरायण हा सण भारतीय दिनदर्शिकेनुसार ज्या दिवशी हिवाळा उन्हाळ्यात बदलू लागतो तो दिवस चिन्हांकित करत असतो.

गुजराथ मध्ये आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाची सुरवात १९८९ पासून झाली. यंदा या महोत्सवाचे ३० वे वर्ष आहे. दरवर्षी या महोत्सवात सहभागी होण्यासाठी येणाऱ्या परदेशी लोकांची संख्या वाढतीच असून जगाच्या पाठीवरील अनेक देश या स्पर्धेत आवर्जून सहभागी होतात. याचे मुख्य आकर्षण असते ते विविध रंगाचे, आकाराचे पतंग.
भारतासह अनेक देशांतून पर्यटक या पतंग महोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी येत अहमदाबाद येथे येत असतात. साबरमती नदीच्या किनारी हा पतंग महोत्सव साजरा होतो.
पतंग महोत्सवाच्या निमित्ताने महिनाभर आधीपासूनची गुजरातची बाजारपेठ विविध पतंगांनी सजलेली असते. विविध प्रकारचे पतंग , कपडे आणि अन्य वस्तुंनी इथली बाजारपेठ साजते.
मकर संक्रांतीच्या अगोदरच्या रविवारपासून हा महोत्सव सुरु होतो आणि मकरसंक्रांतीला संपतो. संपूर्ण गुजराथच नव्हे तर भारताच्या अनेक राज्यात यावेळी पतंग उडविण्याची प्रथा आहे. दिवसभराचा पतंग उडविण्याचा आनंद सायंकाळ उतरू लागली की अधिक वाढतो कारण या वेळी आकाशात आत दिवे असलेले लाखो आकाशकंदील सोडले जातात आणि आकाशीच्या चांदण्या पृथ्वीवर आल्याचा भास निर्माण होतो. रात्री उशिरा आतषबाजीने पुन्हा एकदा आकाश उजळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT