ipl 2022 mega auction update  sakal
आयपीएल 2022 (IPL-2022) ची रिटेन्शन प्रक्रिया पार पडली. याचबरोबर आयपीएल 2022 मेगा ऑक्शनमध्ये (Mega Auction) सहभाग नोंदवण्यासाठी खेळाडूंच्या नोंदणी प्रक्रियेची देखील 20 जानेवारी ही शेवटची तारीख होती. ही नोंदणी प्रक्रिया पार पडल्यानंतर अनेक दिग्गज खेळाडूंनी यंदाच्या हंगामासाठी नोंदणीच केली नसल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये प्रामुख्याने इंग्लंडच्या खेळाडूंचा समावेश आहे. याचबरोबर आता T-20 क्रिकेटचा युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेल देखील आपल्याला आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही. ख्रिस गेल पाठोपाठ, जो रुट, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर आणि मिचेल स्टार्क यांनी देखील आयपीएल 2022 च्या लिलाव प्रक्रियेसाठी नोंदणी केलेली नाही. तसेच सॅम करन देखील दुखापतीतून सावरण्यासाठी यंदाचा आयपीएल हंगाम खेळणार नाही.(IPL 2022 Mega Auction Update)
सकाळ+ चे सदस्य व्हा   
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news,  Watch Live Streaming  on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.