IPL 2022 Schedule | IPL 2022 Timetable sakal
फोटोग्राफी

IPL 2022 : 12 दिवस मिळणार आयपीएलचा डबल डोस

Kiran Mahanavar

इंडियन प्रीमियर लीगचे (IPL) काउंटडाऊनला सुरूवात झाले आहे. 26 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार असून, त्यासाठी आयोजकांनी तयारी सुरू झाली केली आहे. महाराष्ट्र सरकार आणि आयपीएलशी संबंधित अधिकाऱ्यांमध्ये बैठका होत आहेत. ज्यामध्ये आयपीएलशी संबंधित अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली असून आयपीएलवर कोणतेही विघ्न येऊ नये याची पुरेपूर काळजी घेतली जात आहे.

आयपीएलमध्ये यावेळी मुंबईत एकूण 55 सामने होणार आहे. त्यामुळे 8 मार्चपासून संघ मुंबईत पोहोचण्यास सुरुवात करतील. काही दिवस क्वारंटाइन असेल, त्यानंतर 14 ते 15 मार्चपर्यंत संघ सराव करू शकतील
आयपीएल खेळण्यासाठी येणाऱ्या सर्व खेळाडूंना ३ ते ५ दिवस क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार आहे. मुंबईला जाण्यापूर्वी प्रत्येकाला RT-PCR चाचणी स्वतःच्या घरी करून घ्यावी लागेल.
ठाण्यातील रिलायन्स कॉर्पोरेट पार्क, एमसीए मैदानावर संघांना सरावाची संधी दिली जाईल. कारण आयपीएलचे सर्व साखळी सामने केवळ चार स्टेडियममध्ये खेळवले जाणार असल्याने संघांना सरावासाठी स्वतंत्र सुविधा देण्यात आल्या आहेत.
आयपीएल 26 मार्चपासून सुरू होणार असून ही स्पर्धा 29 मे पर्यंत चालणार आहे. आयपीएलमध्ये एकूण 70 सामने खेळले जाणार आहेत, यावेळी एकूण 12 डबल हेडर असू शकतात. म्हणजेच फक्त 12 दिवस असतील ज्यामध्ये दोन सामने होतील.
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर 20 सामने होणार आहेत, तर 15 सामने सीसीआय स्टेडियमवर होणार आहेत, याशिवाय डीवाय पाटील स्टेडियमवर 20 सामने होणार आहेत. पुण्यातील एमसीए स्टेडियमवर एकूण 15 सामने होणार आहेत.
आयपीएलमध्ये एकूण 10 संघ सहभागी होत असून, त्यांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. गट-अ मध्ये मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, लखनौ सुपर जायंट्स आहेत.
ब गटात चेन्नई सुपर किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT