Who is Abhishek Sharma | ipl 2022 sakal
फोटोग्राफी

कोण आहे शर्माजीचा छोरा; ज्याच्या तोऱ्यानं हैदराबादनं साकारला विजयी 'अभिषेक'

इंडियन प्रीमियर लीगच्या 17 व्या सामन्यात, सनरायझर्स हैदराबादचा (SRH) युवा फलंदाज अभिषेक शर्मा झळकला

Kiran Mahanavar

IPL 2022 : इंडियन प्रीमियर लीगच्या 17 व्या सामन्यात, सनरायझर्स हैदराबादचा (SRH) युवा फलंदाज अभिषेक शर्मा झळकला. डावखुरा फलंदाज अभिषेकने चेन्नई सुपर किंग्जच्या (CSK) गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत 75 धावांची शानदार खेळी केली. ज्यात 5 चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. अभिषेक शर्माच्या आयपीएल कारकिर्दीतील हे पहिले अर्धशतक होते. त्याच्या खेळीमुळे सनरायझर्सने सहज विजयाची नोंद केली.

अभिषेक शर्माला सनरायझर्स हैदराबादने 6.50 कोटींना विकत घेतले आहे. डेव्हिड वॉर्नरसारखा दिग्गज खेळाडूही इतक्या किमतीला विकला गेला नाही. अभिषेक शर्मा देखील मागील तीन हंगामात सनरायझर्स हैदराबाद संघाचा भाग होता.
अभिषेक शर्मा स्वत:च्या यशाचे श्रेय भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगला देतो. अभिषेक शर्माने एका मुलाखतीत सांगितले होते की, युवराज सिंगसोबतच्या ट्रेनिंगमुळे खूप फायदा झाला. अभिषेक शर्मा पहिल्यांदा प्रकाशझोतात आला जेव्हा त्याने पंजाबसाठी अंडर-19 मध्ये पदार्पण केले आणि वीनू मांकड़ ट्रॉफीमध्ये शतक झळकावले होते.
याआधी त्याने 2015-16 मध्ये सर्वाधिक धावा करत अंडर-16 विजय मर्चंट ट्रॉफीवर वर्चस्व गाजवले होते. अभिषेक 109.09 च्या सरासरीने 1200 धावा करत अव्वल स्थानावर राहिला. जानेवारी 2018 मध्ये झालेल्या आयपीएल लिलावात दिल्ली डेअरडेव्हिल्सने अभिषेक शर्माला 55 लाख रुपयांना विकत घेतले.
अमृतसरमध्ये जन्मलेला अभिषेक वरपासून खालच्या ऑर्डरपर्यंत जोरदार फलंदाजी करू शकतो. याशिवाय तो अचूक डावखुरा फिरकी फेकण्यात ही माहीर आहे. अभिषेकने त्याच्या नेतृत्वाखाली भारताला 2016 मध्ये अंडर-19 आशिया चषक जिंकून दिला आहे. अंडर-19 विश्वचषकाच्या काही महिन्यांपूर्वी अभिषेकच्या जागी पृथ्वी शॉकडे भारतीय संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले होते.
अंडर-19 विश्वचषक 2018 मध्ये गोलंदाजी करताना त्याने 3.91 च्या इकॉनॉमी रेटने 6 विकेट घेतल्या. जेव्हा त्याच्या बॅटने धावांची गरज होती तेव्हा त्याने उपांत्यपूर्व फेरीत बांगलादेशविरुद्ध अर्धशतक झळकावून संघाची धावसंख्या २६५ पर्यंत नेली. त्या सामन्यात भारताची खालची फळी फ्लॉप ठरली होती.
श्रीलंकेत झालेल्या युवा आशिया चषक 2016 जिंकणाऱ्या भारतीय अंडर-19 संघाचे नेतृत्व अभिषेक शर्माने केले होत. अभिषेकने इंग्लंडच्या U-19 विरुद्ध घरच्या मैदानावर 5 सामन्यांच्या युवा एकदिवसीय मालिकेत त्यांचे नेतृत्व केले जी त्यांनी 3-1 च्या फरकाने जिंकली. नंतर न्यूझीलंडमध्ये झालेल्या U-19 विश्वचषक स्पर्धेत तो पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली खेळला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar On Narendra Modi : मोदींनी ७५ व्या वर्षी राजकारणातून निवृत्त व्हावं का? शरद पवारांनी एका वाक्यात सांगितलं, देवाभाऊंवरी टीका

Gadchiroli News: दोन महिला माओवाद्यांना कंठस्नान; गडचिरोली जिल्ह्यातील मोडस्के जंगल परिसरात चकमक

Gold Rate Today : सोन्यात घसरण सुरुच,चांदीही झाली स्वस्त; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Teacher Recruitment : 'राज्यात सरकारी-अनुदानित शाळांमध्ये तब्बल 18,500 नवीन शिक्षकांची भरती करणार'; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

बाबो! सुरज चव्हाणचं खरंच लग्न ठरलं? सोशल मीडियावर शेयर केलेली पोस्ट चर्चेत, चाहत्यांचा म्हणाले..."हीच का आपली वहिनी?"

SCROLL FOR NEXT