फोटोग्राफी

आयपीएल 15 व्या सीझन मध्ये टीम इंडियाला गवसले हे हिरे

यंदाच्या आयपीएलमध्ये युवा खेळाडूंनी धडाकेबाज खेळी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

धनश्री ओतारी

आयपीएल 15 वा सीझन आता मह्त्त्वाच्या टप्प्यात आला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये युवा खेळाडूंनी धडाकेबाज खेळी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तर काही युव खेळाडूंना टीम इंडियामध्ये स्थान देण्याची मागणी क्रिकेट जगतातून होत आहे. जाणुन घेऊ त्या खेळाडूंबद्दल

रिंकू सिंह : कोलकोता नाईट रायडर्सचा फलंदाज रिंकू सिंह यंदाच्या सीझनमध्ये केवळ 7 सामन्यात रिंकू सिंहला खेळण्याची संधी मिळाली आहे. त्याने संधीचे सोनं केल्याचे पाहायला मिळाले. लखनऊविरुद्ध रिंकूने 15 चेंडूवर 40 धावा केकेआरच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. आयपीएल 2017 रिंकूला पंजाब इलेव्हन संघाने 10 लाख रुपयामध्ये विकत घेतले होते. त्यानंतर त्याने 2018 मध्ये केकेआरच्या ताफ्यात पादर्पण केलं. तर 2022 मध्ये रिंकूला केकेआरे 55 लाख रुपये देत खरेदी केलं. त्याने आत्तापर्यंत खेळलेल्या सामन्यात 34.80 सरासरीने 174 धावा केल्या आहेत.
मोहसीन खान: आयपीएलच्या महाकुंभात नव्याने पदार्पण केलेला लखनऊ सुपर जायंट्स संघ फॉर्मात आहे. संघातील वेगवान आणि संथ गोलंदाज कहर करत आहेत. आपल्या आयपीएल पदार्पणाच्या मोसमात मोहसीन खानने आतापर्यंत 8 सामन्यात 13 विकेट घेतल्या आहेत. मोहसीनने या काळात 5.93 च्या इकॉनॉमी रेटने धावा दिल्या. आयपीएल 2022 च्या लिलावात मोहसिन खानला लखनौ सुपर जायंट्सने 20 लाख रुपयांच्या मूळ किमतीत खरेदी केले होते. यापूर्वी मोहसीन मुंबई इंडियन्स (MI) संघाचा भाग होता.
तिलक वर्मा : पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्स (MI) ची आयपीएलच्या 15 व्या हंगामात खराब कामगिरी झाली असेल, परंतु तिलक वर्मा संघासाठी एक स्टार म्हणून उदयास आला. तिलक याने आतापर्यंत 13 सामन्यात 37.60 च्या सरासरीने आणि 131.46 च्या स्ट्राईक रेटने 376 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने दोन अर्धशतकेही झळकली असून 61 धावा ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या ठरली आहे. क्रिकेट विश्लेषकांच्या मते, तिलक वर्मा आगामी काळात टीम इंडियासाठी खेळू शकतो.
शाहबाज अहमद: रॉयल चॅलेंजर्सचा ऑलराऊंडर शाहबाज अहमदने सर्वांनाच प्रभावित केलं आहे. अहमदने आयपीएलमध्ये सुरुवातीला 13 सामन्यात 25.88 सरासरीने207 धावा केल्या आहेत. तसेत त्याने यंदाच्या सीझनमध्ये चार विकेटदेखील घेतल्या आहेत. 27 वर्षीय अहमदला बंगळुरुने 2.40 कोटीला विकत घेतले. गेल्या 2 सीझनपासून शाहबाज आरसीबीसोबत आहे.
आयुष बदोनी: मिडिल ऑर्डरमध्ये खेळणारा आयुष बदोनी लखनऊ संघाकडून आत्तापर्यंत 13 सामन्यात खेळला आहे. या दरम्यान बदोनीने 20.13 च्या सरासरीने 161 धावा केल्या आहे. यामध्ये एक अर्धशतकाचाही समावेश आहे. मेगा ऑक्शनमध्ये लखनऊने 20 लाख देत खरेदी केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT