IPL Mega Auction 2022  sakal
फोटोग्राफी

IPL Mega Auction : लिलावात मालामाल होतील असे 5 विदेशी ओपनर

Kiran Mahanavar

IPL 2022 मेगा ऑक्शन (IPL Mega Auction) 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी होणार आहे. यावेळी मेगा लिलाव बंगळुरू (Bengaluru) मध्ये पार पडणार असून अनेक दिग्गजांना आपल्या ताफ्यात सामील करुन घेण्यासाठी 10 फ्रँचायझीमध्ये चढाओढ पाहायला मिळेल. लखनऊ आणि अहमदाबाद हे दोन नवे संघ पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहेत. संघ बांधणी करण्यासाठी ते मोठी रक्कम खर्च करु शकतात. विद्यमान फ्रँचायझी नव्या संघावर भारी ठरणार की नवे संघ लिलावाच्या आखाड्यात बाजी मारणार हे पाहणे खूपच रोमहर्षक असणार आहे. या लिलावात विदेशी सलामीवीर खेळाडूंसाठी मोठी बोली लावल्याचे पाहायला मिळू शकते. जाणून घेऊयात त्यात कोणत्या दिग्गज खेळाडूंची चलती असेल.

या यादीत पहिले नाव डेव्हिड वॉर्नरचे आहे. वॉर्नर सलामीवीर म्हणून ज्या संघात जाईल तो संघासाठी फायद्याचा सौदा असेल. टी-20 विश्वचषक आणि ऍशेसमध्ये वॉर्नरची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूने 149 सामन्यांमध्ये 5449 धावा केल्या आहेत. वॉर्नरसाठी शेवटचा हंगाम चांगला राहिला नसला तरी त्याच्या क्षमतेवर शंका घेता येत नाही. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर कर्णधारपदासाठी देखील उत्तम पर्याय ठरु शकतो. शर्यतीतही दिसू शकतो.
फाफ डू प्लेसिसला आयपीएलमध्ये सीएसकेने कायम ठेवले नाही, परंतु लिलावादरम्यान चेन्नई नक्कीच त्याच्यावर बोली लावू शकते. फाफ डू प्लेसिस हा उत्कृष्ट सलामीवीर असून त्याच्या फलंदाजीत संयम आहे. सीएसके नेहमीच दर्जेदार फलंदाज संघात ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे CSK मेगा लिलावात फाफ डू प्लेसिसवर मोठी बोली लावताना दिसले तर नवल वाटणार नाही.
लिलावादरम्यान इंग्लंडचा जॉनी बेअरस्टोही फ्रँचायझींच्या नजरेत असेल. बेअरस्टो हा स्फोटक सलामीवीर म्हणून ओळखला जातो. आयपीएलमध्ये बेअरस्टोने 142.19 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. केकेआर संघ उत्तम सलामीवीराच्या शोधात बेअरस्टोवर मोठी रक्कम खर्च करु शकतो.
इंग्लंडच्या दुसऱ्या स्फोटक जेसन रॉयसाठीही फ्रँचायझी मोठी रक्कम खर्च करण्यास तयार असतील. रॉय मागील हंगामात हैदराबादकडून खेळला होता. जेसन हा स्फोटक फलंदाज आहे आणि सलामीवीर म्हणून कोणत्याही संघाला त्याचा फायदा होऊ शकतो. अशा स्थितीत फ्रँचायझी त्यांच्यावर मोठी बोली लावताना दिसतील, असा अंदाज आहे.
दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक / सलामीवीर क्विंटन डी कॉक यांच्याबाबत फ्रँचायझींनी त्यांची रणनीती तयार केलेली असावी. कसोटी क्रिकेटपासून वेगळे झाल्यानंतर क्विंटन डी कॉकचे संपूर्ण लक्ष लहान फॉरमॅटवर आहे. अशा स्थितीत आयपीएल फ्रँचायझी लिलावादरम्यान डी कॉकला विकत घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू शकते. यावेळी डी कॉकचा फॉर्मही जबरदस्त आहे. तुम्हाला सांगतो की, यावेळी आयपीएलचा संपूर्ण सीझन मुंबईत होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआय त्याच शहरात आयपीएल हंगाम आयोजित करण्याचा निर्णय घेऊ शकते. याबाबत बीसीसीआय लवकरच घोषणा करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushila Karki: Gen-Z चा नायक सुशीला कार्कींसमोर नतमस्तक; कोण आहे सुदन गुरुंग?

आता CIBIL Score वाढवण्यासाठी ChatGPT मदत करणार, पण कशी? जाणून घ्या...

Asia Cup, IND vs PAK: 'आम्ही कोणत्याही संघाला...', भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या कर्णधाराने दिली वॉर्निंग

विकासासाठी शांतता हवी, मणिपूरमधील संघटनांना पंतप्रधान मोदींचं आवाहन; राज्यातील परिस्थितीवरही बोलले

Madhya Pradesh : मध्य प्रदेशमधील १.२६ कोटींहून अधिक लाडक्या बहिणींना मिळणार आर्थिक लाभ; मुख्यमंत्री यादव यांची घोषणा

SCROLL FOR NEXT