Jagannath rath yatra 2022 esakal
फोटोग्राफी

Jagannath Rath Yatra 2022: १ जुलैपासून सुरू होणार जगन्नाथ रथ यात्रा,जाणून घ्या सगळी माहिती

रथ यात्रा शुक्रवारी १ जुलैपासून सुरू होणार आहे.या रथ यात्रेत जगन्नाथांच्या रथाबरोबरच त्यांचा भाऊ बलराम आणि बहिण सुभद्रा असे तीन रथ काढले जातील.

सकाळ ऑनलाईन टीम
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जगन्नाथ यात्रा ठरलेल्या मुहूर्तावर निघणार आहे.आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील दुसऱ्या तिथीमधे जगप्रसिद्ध श्री जगन्नाथांच्या रथ यात्रेला सुरूवात झाली आहे.ही रथ यात्रा शुक्रवारी १ जुलैपासून सुरू होणार आहे.या रथ यात्रेत जगन्नाथांच्या रथाबरोबरच त्यांचा भाऊ बलराम आणि बहिण सुभद्रा असे तीन रथ काढले जातील.जाणून घेऊया या रथयात्रेचे धार्मिक महत्व.
श्री जगन्नाथ आणि रथ यात्रेशी जुळलेल्या काही खास गोष्टी श्री जगन्नाथांचा रथ बनवण्यासाठी एकाही खिळ्याचा उपयोग केला जात नाही.हा रथ पुर्णपणे लाकडाने बनलेला असतो.यात कुठल्याच धातूचा वापर केला जात नाही.अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर रथ बनवण्यास सुरूवात केली जाते.
दरवर्षी श्री जगन्नाथांच्या प्रतिमेसोबतच बलभद्र आणि सुभद्राच्या प्रतिमा कडूलिंबाच्या झाडाच्या लाकडांनी बनवल्या जातात.यावेळी रंगांकडेही विशेष लक्ष दिल्या जातं.श्री जगन्नाथांचा रंग सावळा असल्यामुळे निंबाच्या सावळ्या रंगाच्या लाकडाचाच वापर केल्या जातो.तसेच त्यांचे बहिण भाऊ गोरे असल्याने त्यांच्या प्रतिमांसाठी गोऱ्या रंगाच्या लाकडाचा वापर केला जातो.जगन्नाथांच्या रथाला एकूण १६ चाकं असतात.या रथाला लाल आणि पिवळा रंग दिला जातो.तसेच हा रथ ईतर दोन रथांपेक्षा मोठा असतो.
जगन्नाथांच्या रथाला 'नंदीघोष' म्हणतात तर बलरामाच्या रथाला 'ताल ध्वज' व सुभद्राच्या रथाला 'दर्पदलन' म्हटले जाते.ज्या विहीरीच्या पाण्याने पौर्णिमेच्या दिवशी जगन्नाथांची अंघोळ घातली जाते.एकूण १०८ घाघर पाण्याने जगन्नाथ देवाची अंघोळ घातली जाते. त्यानंतर फेऱ्या घालत रथ जगन्नाथ मंदिराकडून गुंडीचा मंदिरात पोहोचतो.गुंडीचा मंदिर हे जगन्नथांच्या मावशीचे घर आहे.इथे पोहोचल्यानंतर विधी विधानानुसार तिन्ही मूर्त्यांना उतरवले जाते.आणि तिथे यांची स्थापना केली जाते.
सोन्याच्या झाडूने केली जाते रस्त्याची साफ सफाई तिन्ही रथ तयार केल्यानंतर पूजेसाठी पुरीच्या गजपती राजाची पालखी येते.यावेळी रथ मंडप आणि यात्रेच्या रस्त्याची सोन्याच्या झाडूने पूजा केली जाते.
असा असतो जगन्नाथ मंदिराचा महाप्रसाद सगळ्या मंदिरांमधे पूजा झाल्यानंतर प्रसाद वाटला जातो पण या एकमेव मंदिरात पूजा झाल्यानंतर महाप्रसाद होतो.जगन्नाथ मंदिरातलं स्वयंपाकघर जगातील सगळ्यात मोठं स्वयंपाकघर मानलं जातं.हा महाप्रसाद एकावर एक सात भांडी ठेऊन केला जातो.
जगन्नाथ मंदिरातल्या काही खास कहाण्या पुरीच्या जगन्नाथ मंदिरातला झेड्याला खास महत्व आहे.कारण तो कायम हवेच्या विरूद्ध दिशेने हालतो. सर्वात मोठे स्वयंपाकघर मानल्या जाणाऱ्या या मंदिरात ७५२ चूल्ही आहेत.ज्यात मंदिरात महाप्रसाद बनवला जातो. जगन्नथ मंदिराच्या शिखरावर लागलेला सुदर्शन चक्र कुठल्याही दिशेने बघितल्यास एक सारखाच दिसतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Accident: कल्याणमध्ये भीषण अपघात, टेम्पोची दुचाकीला जोरदार धडक; एकाचा मृत्यू

"दारूमुळे नाटक इंडस्ट्री बरबाद झाली" अभिनेते सुनील तावडेंनी व्यक्त केली खंत "मी अत्यंत तिरस्कार..."

Pimpalgaon Rescue: पिंपळगाव-खडकीत विहिरीत पडलेल्या बिबट्याची वनविभाग व ग्रामस्थांच्या मदतीने थरारक सुटका

Mumbai Indians Playing XI: मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात 'तगडा' खेळाडू दाखल, मात्र निर्माण झालाय गोंधळ; कोण IN, कोण OUT?

हेमंत ढोमेच्या सिनेमात सेमच स्टारकास्ट दिसते... इंडस्ट्रीतल्या गटबाजीवर श्वेता शिंदेचं स्पष्ट मत, म्हणते- माझी मुलगी जर...

SCROLL FOR NEXT