विक्रमगड तालुक्यातील हाकेच्या अंतरावर असलेल्या वेहेलपाडा (विठ्ठलनगर) येथे परंपरागत जगदंबा यात्रोत्सव मोठया उत्साहात व जल्लोषाने साजरा करण्यात आला. यात्रोत्सव गावकऱ्यांच्या बोली भाषातील बोहाडा असे म्हणतात. मंगळवारी रात्री रंगपंचमीच्या दिवशी मोठया उत्साहात व भक्तीभावाने यात्रोत्सव साजरा करण्यात आला.
या यात्रोत्सव गेल्या 90 वर्षापासून साजरा केला जात आहे. यावेळी रात्रीपासून पहाटेपर्यत 52 देवदेवतांची सोंगे नाचविण्यात आल्याचे येथील गावकऱ्यांनी यात्रोत्सवाची माहिती देताना सांगितले.आजुबाजूच्या गाव पाडयातील मिळून हजारो लोकांचा सहभाग होता. या यात्रोत्सवाची मजा व भेट देण्यासाठी पंचायत समिती सदस्य, जि.प. सदस्य, ग्रामपंचायत सरपंच त्याचबरोबर आदी प्रतिष्ठीत व्यक्तींनीही भेट दिली. त्यांचे यावेळी मंडळाकडून स्वागत करण्यात आले.स्वंतत्र इतिहास असणारी या गावकऱ्यांची संस्कृती ही मानवी मुल्यांवर आ-बाधित आहे. येथील लोककलेला फार महत्व आहे. पारंपारिक नृत्यकला त्यांच्याकडे आहेत. पारंपारिक नृत्यकला (तारपा, ढोलनाच, टपरीनाच, तुरनाच वगैरे) त्यांच्याकडे आहेत. तसेच अनेक बोली भाषाही आहेत. त्या संस्कृतीमधील बोहाडा पाहण्यासाठी वेहलपाडयाच्या तसेच तालुक्यातील पंचक्रोशीतील लोक रात्री 10 मैल दुरवरुन चालत हा मोठ्या संख्येने एकत्र झाले होते.
या वेळी अनेक दुकानदारांनी वेगवेगळया वस्तुंचे स्टॉल लावलेले होते. नागरिकांनी वस्तू खरेदी करण्याचा आनंद घेतला
गेल्या 90 वर्षाच्या पंरपरनुसार दरवर्शी रंगपंचमीच्या दिवशी वेहेलपाडा(विठ्ठलनगर)येथे बोहाडा साजरा केला जातो.
या यात्रोत्सवात आयोजित केल्याप्रमाणे 20 मार्च रोजी थाप, 21 मार्च रोजी लहान बोहाडा तर 22 मार्च रोजी मोठा बोहाडा या तीन दिवसांत रात्री 8 पासून सकाळी 8 पर्यंत मोठया भक्तिभावाने व जल्लोषात साजरा करण्यात आला.या बोहाडा या़त्रोत्सवात रामायण, महाभारत आदी पौराणिक ग्रंथातील देव-देवतांची निवड करुन ग्रामस्थांनी ठरल्याप्रमाणे घरच्या घरी लाकुड, चिकणमाती या वस्तूंपासून आकर्षक हुबेहुब देवतांचे मुखवटे करण्यात आले. देवदेवतांनुसार या मुखवटयांना पोशाख घालून आणि रितीरिवाज व परंपरेनुसार मशालीच्या उजेडात आणि तालबद्ध वाजंत्रीच्या तालावर बोहाडा यात्रोत्सव सोंगे नाचवून साजरा केला.प्रारंभी गजाननाला वंदन करुन त्यांचे सोंग (मुखवटा) नाचवला जातो. त्यानंतर सरस्वती विष्णु आणि पुराणातील देवदेवतांना तसेच देवदेवतांच्या युद्धांचे प्रसंग सोंगे नाचवून भक्तिभावाने सादर केले जातात. या जल्लोषाच्या वातावरणात येथील ग्रामस्थ तल्लीन झालेले दिसत होते. विविध सोंगे नाचवून देवतांच्या अनेक प्रसंगांचे सादरीकरण पहाटेपर्यंत सूरू होते. त्यानंतर गावातील मूळ ग्रामदेवता जगदंबा मातेची विधीवत पूजा करुन व महिशासुर यांच्या युध्दाची सोंगे नाचविले जाते. गावात रोगराई, संकटे येऊ नयेत म्हणूनच हा बोहाडा म्हणजेच जगदंबा यात्रोत्सव साजरा करतात. ग्रामदेवी नवसाला पावते अशी येथील लोकांची श्रध्दा असून यावेळी घेतलेले नवस फेडण्यासाठी व नवीन नवस बोलण्यासाठी लोक एकच गर्दी करीत होते. या यात्रोत्सवात सर्व धर्म,जातीचे लोक सामील होऊन बोहाडा यात्रोत्सवाचा मनमुराद आनंद लूटला.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.