अभिनेत्री जान्हवी कपूर तिची बहीण खुशी कपूरसोबत दुबईला फिरायला गेली असून तिथले काही खास फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. वाळवंटातील जान्हवीचा हॉट अंदाज पाहून तिचा एक्स बॉयफ्रेंडसुद्धा कमेंट करण्यापासून स्वत:ला रोखू शकला नाही.
वाळवंटात एटीव्ही चालवताना जान्हवी आणि खुशीने पोझ दिले आहेत. जान्हवी आणि खुशीसोबत या दोघींचा मित्र ओरहानसुद्धा आहे. हे तिघे दुबईत सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. 'Dessert in the desert' असं कॅप्शन देत जान्हवीने हे फोटो पोस्ट केले आहेत. त्यावर जान्हवीचा एक्स बॉयफ्रेंड शिखर पहारियाने कमेंट केली आहे. 'माशाल्लाह' अशी कमेंट शिखरने जान्हवीच्या फोटोवर केली आहे. जान्हवी-खुशीची बहीण अन्शुला कपूर, मैत्रीण आलिया कश्यप, काका संजय कपूर यांनीसुद्धा या फोटोंवर कमेंट्स केल्या आहेत. जान्हवी 'रुही' या चित्रपटामध्ये झळकली होती. ती बरेच चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहेत. 'गुड लक जेरी', 'दोस्ताना २' आणि 'हेलेन' या मल्याळम चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्येही ती झळकणार आहे. ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.