Kargil Vijay Diwas
Kargil Vijay Diwas sakal
फोटोग्राफी

Kargil Vijay Diwas: 'जरा याद करो कुर्बानी', जाणून घ्या 'या' सहा शुरवीरांची कहानी

सकाळ डिजिटल टीम

26 जुलै 1999 रोजी भारतीय लष्कराने कारगिल युद्धात 'ऑपरेशन विजय' यशस्वीपणे पार पाडून भारताला घुसखोरांच्या तावडीतून मुक्त केले होते. या स्मरणार्थ '26 जुलै' हा दरवर्षी कारगिल दिन म्हणून साजरा केला जातो.

भारताचे रक्षण करताना मरण पत्करलेल्या शहिदांचे स्मरण करण्याचा आणि त्यांना आदरांजली अर्पण करण्याचा हा दिवस आहे. यातील काही शहीद वीरांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. (Kargil Vijay Diwas remember these 6 Martyrs who devoted thier life for country)

कॅप्टन विक्रम बत्रा हिमाचल प्रदेशातील पालमपूरच्या 13 J&K रायफल्सचे कॅप्टन विक्रम बत्रा हे अशा शूरवीरांपैकी एक आहेत अगदी पाकिस्तानी सैनिकांनीही त्यांच्या शौर्याला सलाम करत 'शेरशाह' या नावाने त्यांचा गौरव केला होता. या शूर वीराने एकट्याने अनेक शत्रूंना ठार केले. समोरून झालेल्या भीषण गोळीबारात जखमी होऊनही एका जखमी सहकारी अधिकाऱ्याला युद्धभूमीतून बाहेर काढण्याच्या प्रयत्नात 7 जुलै रोजी सकाळी विक्रम बत्रा शहीद झाले.
कॅप्टन अनुज नायर: टायगर हिल्स क्षेत्रातील एक महत्त्वाचे शिखर असलेल्या 'वन पिंपल'च्या लढाईत 17 जाट रेजिमेंटचे शूर कॅप्टन अनुज नायर यांनी आपल्या 6 सहकाऱ्यांच्या शहीद झाल्यानंतरही त्यांनी लढाई कायम ठेवली. गंभीर जखमी असूनही,त्यांनी एकट्याने शत्रूंचा सामना केला आणि शहिद झाले. यानंतर भारतीय सैन्याने हे शिखर परत काबीज केले.
मेजर पद्मपाणी आचार्य : राजपुताना रायफल्सचे मेजर पद्मपाणी आचार्य हेही कारगिलमध्ये शत्रूंशी लढताना शहीद झाले होते. द्रास सेक्टरमधील या युद्धात त्यांचे भाऊही सहभागी झाले होते. या शौर्याबद्दल त्यांना 'महावीर चक्र'ही देण्यात आले होते.
लेफ्टनंट मनोज पांडे 1/11 गोरखा रायफल्सचे लेफ्टनंट मनोज पांडे यांचे शौर्य आजही बटालिक सेक्टरच्या 'जुबार टॉप'वर लिहिलेले आहे. आपल्या गोरखा पलटणीसह दुर्गम डोंगराळ भागात 'काली माता की जय'चा नारा देत त्यांनी शत्रूंचा सामना केला.गंभीर जखमी असतानाही मनोजने शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली.
कॅप्टन सौरभ कालिया : टोलोलिंगच्या दुर्गम डोंगरात लपून बसलेल्या घुसखोरांवर हल्ला करताना, हवाई दलातील अनेक शूर अधिकारी शहीद झाले. यात कॅप्टन सौरभ कालिया आणि त्यांच्या दलातील जवानांनी प्रथम बलिदान दिले. प्रचंड यातना सहन करूनही कॅप्टन कालियाने शत्रूंना कोणतीही माहिती दिली नाही.
स्क्वाड्रन लीडर अजय आहुजा : स्क्वॉड्रन लीडर अजय आहुजाचे विमानही शत्रूच्या गोळीबाराला बळी पडले. अजयचे लढाऊ विमान शत्रूच्या गोळीबारात उद्ध्वस्त झाले, तरीही त्यांनी हार मानली नाही आणि पॅराशूटने उतरतानाही शत्रूंवर गोळीबार सुरूच ठेवला आणि लढताना त्याचा मृत्यू झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: दमदार सुरुवातीनंतर दिल्लीला दोन मोठे धक्के! फ्रेझर-मॅकगर्कनंतर शाय होपही बाद

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT