Karisma Kapoor To Sushmita Sen: Meet The Bollywood Single Mothers, they are rock...
Google
डिंपल कपाडिया-
बॉलीवूडची प्रसिध्द अभिनेत्री डिंपल कपाडियांनी वय लहान असतानाच त्या काळच्या टॉप स्टार राजेश खन्नाशी लग्न(1972) केलं होतं. लग्नानंतर डिंपल यांनी चित्रपटांमध्ये काम करणं सोडलं. त्या ट्विंकल आणि रिंकीची आई झाल्या. असं म्हटलं जातं राजेश खन्ना यांनी डिंपलना चित्रपटांमध्ये काम करण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्यांच्यात खटके उडू लागले. त्यानंतर मुलींना घेऊन डिंपल वेगळ्या राहू लागल्या आणि एकटीनं ट्विंकल आणि रिंकी या आपल्या दोन्ही मुलींना सांभाळू लागल्या. त्यांनी त्यासाठी पुन्हा चित्रपटात काम करायला सुरुवात केली. आज त्यांच्या दोन्ही मुली आपापल्या क्षेत्रात नाव कमावत आहेत आणि वैवाहिक आयुष्य आनंदाने जगत आहेत. सुश्मिता सेन-
बॉलीवूड अभिनेत्री सुश्मिता सेन हिनं लग्न न करता रिना आणि अलिशा या दोन मुलींना दत्तक घेतले आहे. रिना या आपल्या मोठ्या मुलीचा २३ वा वाढदिवस सुश्मितानं नुकताच मोठ्या थाटात साजरा केला. ती नेहमी आपल्या मुलींसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. रिनाला २००० साली तर अलिशाला २०१० साली सुश्मितानं दत्तक घेतलं होतं. करिश्मा कपूर-
2014 मध्ये संजय कपूरसोबत घटस्फोट झाल्यानंतर करिश्मानं आपल्या दोन मुलांची जबाबदारी स्वतः स्विकारली. ती एक उत्तम आई बनून आपल्या मुलांचा आज एकटीनं सांभाळ करत आहे. करिश्माचं इन्स्टाग्राम चेक केलं तरी तेथे तिनं पोस्ट केलेल्या फोटोवरनं ती मुलांचा उत्तम सांभाळ करते आहे हे स्पष्ट जाणवतं. करिश्माच्या मुलीचे नाव समायरा असून,मुलाचे नाव किआन आहे.नीना गुप्ता-
नीना गुप्ता यांचं विवियन रिचर्ड्ससोबत अफेअर होते,त्या नात्यापासून त्यांना मुलगी झाली,जी आजच्या घडीची टॉपची फॅशन डिझायनर असून तिचे नाव मसाबा गुप्ता आहे. आता हे सगळं आपल्याला माहीत असेलच. पण २५-३० वर्षांपूर्वी लग्न न करता प्रेग्नेंट राहिलेल्या नीना गुप्ता यांनी बाळाला जन्म द्यायचा घेतलेला निर्णय आणि त्याच जिद्दीनं जन्माला आलेल्या मुलीचा केलेला उत्तम सांभाळ त्यांची एक उत्तम आई म्हणून ओळख करुन देतो. एकता कपूर-
एकता कपूरनं सरोगसीच्या मदतीनं एका मुलाची आई बनली आहे. तिनं लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता,पण तिला मातृत्वाचा आनंदही घ्यायचा होता. म्हणूनच आपला भाऊ तुषार कपूरचा सल्ला ऐकण्याचं तिनं ठरवंल आणि सरोगसीचा पर्याय निवडला. एकतानं आपल्या मुलाला रवी कपूर म्हणजे आपले वडील जितेंद्र यांचे मूळ नाव दिले आहे. श्वेता तिवारी-
श्वेता तिवारीनं दोन लग्न केली पण दोन्ही वेळा तिचं लग्न टिकलं नाही. तिचं पहिलं लग्न अभिनेता राजा चौधरीशी झालं होतं. त्या लग्नापासून तिला पलक तिवारी मुलगी आहे. पलकनं सध्या बॉलीवूडमध्ये झोकात एन्ट्री केली असून ती २१ वर्षांची आहे. तर श्वेताचं दुसरं लग्न अभिनव कोहलीसोबत झालं ,त्या लग्नापासून तिला ५ वर्षांचा एक मुलगा आहे. श्वेता आपल्या दोन्ही मुंलाचा सांभाळ उत्तम करत आहे. पलकने अनेकदा आपल्या आईचे गोडवे गाताना आपण ऐकलंही असेल. अमृता सिंग-
अमृता सिंगने सैफ अली खानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर एकटीनं आपल्या मुलांचा सांभाळ केला आहे. सारा अली खान आणि इब्राहिम अली खान या दोन्ही मुलांना उत्तम संस्कार देत अमृतानं त्यांचा सांभाळ केला आहे. अनेकदा सारा ज्या पद्धतीनं लोकांशी मिळून-मिसळून वागते तेव्हा याचा दाखला मिळतो. पूजा बेदी-
बॉलीवूड आभिनेत्री आणि प्रसिद्ध निवेदक, अभिनेता कबीर बेदी यांची मुलगी पूजा बेदी ही सुध्दा एक सिंगल मदर आहे. पूजाने फरहान इब्राहिमशी लग्न केलं होतं, मात्र काही कारणास्तव त्यांच्या नात्यात फूट पडली. घटस्फोटानंतर पूजाने मुलांची जबाबदारी स्वतः घेतली आणि आता सिंगल मदर म्हणून ती तिची जबाबदारी लीलया सांभाळतेयं. साक्षी तन्वर-
कहानी घर घर की ते बडे अच्छे लगते है सारख्या प्रसिद्ध मालिकांमधून घराघरात पोहोचलेली साक्षी जशी ऑनस्क्रीन उत्तम आई म्हणून ओळखली जाते तसंच तिनं २०१८ मध्ये ९ महिन्यांच्या एका मुलीला दत्तक घेतले आहे. साक्षीनं लग्न केलं नसलं तरी एक उत्तम आई म्हणून ती दित्याचा म्हणजे तिच्या दत्तक मुलीचा खूप छान सांभाळ करत आहे. जुही परमार-
कुमकुम या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या जुही परमारनं अभिनेता-बिझनेसमन सचिन श्रॉफसोबत २०१८ मध्ये घटस्फोट घेतल्यानंतर एकटीनं आपल्या ९ वर्षाच्या मुलीला सांभाळायची जबाबदारी लीलया पेलली आहे. २००९ मध्ये तिनं सचिनसोबत लग्न केलं होतं. २०१३ मध्ये त्यांना समायरा झाली आणि २०१८ मध्ये सचिनसोबत पटत नसल्यानं जुहीनं वेगळं व्हायचा निर्णय घेतला होता. पण आज ती मुलीसोबत खूप आनंदात आपलं आयुष्य जगत आहे याविषयी सोशल मीडियावरनं अपडेट तिच्याविषयी मिळत असते. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.