Happy Birthday Kieron Pollard sakal
फोटोग्राफी

ड्रग्ज गांजा गॅंगमध्ये वाढला, एक वेळची भाकरी खाऊन बनला घातक बॅट्समन

मुंबई इंडियन्सचा धोकादायक घातक बॅट्समन किरॉन पोलार्ड आज 35 वर्षांचा झाला आहे.

Kiran Mahanavar

Happy Birthday Kieron Pollard : वेस्ट इंडिज आणि मुंबई इंडियन्सचा धोकादायक घातक बॅट्समन किरॉन पोलार्ड आज 35 वर्षांचा झाला आहे. किरॉन पोलार्ड हा T20 क्रिकेटमधील महान फलंदाजांपैकी एक आहे. किरॉन पोलार्डच्या क्रिकेटच्या या फॉरमॅटमध्ये एकूण 11,571 धावा आहेत.

टी-20 क्रिकेटमध्ये एक शतक आणि 56 अर्धशतकं झळकावण्याचा विक्रम किरॉन पोलार्डच्या नावावर आहे.
किरॉन पोलार्डच्या जागतिक क्रिकेटमध्ये सर्वत्र चर्चा आहे, पण इतका महान क्रिकेटपटू बनणे त्याच्यासाठी सोपे राहिलेले नाही.
कीरॉन पोलार्डच्या जन्मानंतर त्याच्या वडिलांनी त्याला आणि त्याच्या आईला एकटे सोडले होते. यानंतर आईनेच किरॉन पोलार्डला वाढवले. घरची परिस्थिती इतकी बिकट होती की पोलार्ड आणि त्याच्या आईला एक वेळची भाकरी खाऊन उदरनिर्वाह करावा लागला.
पोलार्डने आपले बालपण पोर्ट ऑफ स्पेनच्या टॅकारिगुवा भागात घालवले आहे. जिथे नेहमीच गुंड आणि गुन्हेगारांची सावली असायची.
खून, दरोडा, ड्रग्ज आणि गांजा यासारख्या गोष्टींशी संबंधित गुन्हे या भागात होत असत. पण पोलार्डने हार मानली नाही आणि अशाच वातावरणात राहून एक यशस्वी क्रिकेटपटू बनला.
खुद्द पोलार्डने त्याच्या एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. पोलार्ड म्हणाला होता की, माझ्या आजूबाजूचे गुन्हे पाहिल्यानंतरही माझे लक्ष कधीच हरवले नाही आणि मी वयाच्या १५व्या वर्षापासून क्रिकेट खेळण्यासाठी मेहनत करू लागलो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑफिसला यायला उशीर होतो... दहिसरवरून येताना ट्राफिक लागतं, मला भायखळ्याला बंगला द्या; BMC उपमहापौरांची अश्विनी भिडेंकडे मागणी

Karad Development: आंदोलनापेक्षा विकासाचा हिशेब द्या; भाजप नगरसेवकांना इंद्रजीत भोपते यांचा सवाल, 'घोषणाबाजी नव्हे तर नियोजन महत्त्वाचे'

Latest Marathi News Live Update : बनावट कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानी नागरिक कर्नाटकात; 'एसआयआर' मोहिमेदरम्यान प्रकार उघडकीस

Blue Aadhaar Card : आता घरबसल्या बनवा ५ पाच वर्षांपर्यंतच्या बाळाचं आधार कार्ड, सोपी आहे प्रक्रिया

Tamil Nadu Cow Slaughter Ban : सर्वोच्च न्यायालयाकडून तामिळनाडूतील 'विजय सरकार'ला दिलासा; गोहत्या बंदीबाबत मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती

SCROLL FOR NEXT