kishore kumar death anniversary unseen photos and unheard stories of kishore kumar  sakal
फोटोग्राफी

Photo: बघा, किशोर कुमार यांचे न पाहिलेले फोटो आणि काही खास किस्से..

आज किशोर कुमार यांचा स्मृतिदिन, त्यानिमित्ताने जाणून घ्या त्यांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी..

नीलेश अडसूळ

kishore kumar: गेली अनेक दशके रसिकमनावर रुंजी घालणारा एक अजरामर आवाज म्हणजे किशोर कुमार. आज किशोर कुमार यांचा स्मृतिदिन. अवघ्या 57 व्या वर्षी जगाचा निरोप घेणारे किशोर दा अत्यंत कमी वयात प्रचंड मोठी कामगिरी करून गेले. त्यांचे संगीतक्षेत्रातील योगदान हे केवळ दखल घेण्याजोगे नाही तर पुढच्या कित्येक पिढ्यांना मार्गदर्शन करणारे आहे. केवळ गायनच नाही तर अभिनय, लेखन आणि चित्रपट निर्मातीही त्यांनी केली. अत्यंत कमी वयात अढळपदी पोहोचलेल्या किशोर कुमार यांच्याविषयी जाणून घेऊया काही खास किस्से..

किशोर कुमार हे अत्यंत प्रतिभावान गायक होते. आपल्या गायकीबरोबरच ते उत्तर अभिनेते देखील होते. विशेष म्हणजे महिलेच्या आवाजातही गाणं गायची खुबी किशोर कुमार यांच्याकडे होती. सन १९६२ मधील हाफ तिकीट या चित्रपटातील 'आके सीधी लगी दिल पे जैसी' हे गाणं किशोर कुमार यांनी मेल-फिमेल अशा दोन्ही आवाजात गायलं आहे. आधी लता मंगेशकर हे गाणं गाणार होत्या पण काही कारणांमुळं त्या गाऊ शकल्या नाहीत म्हणून किशोर कुमार यांनी स्वतः महिलेच्या आवाजात गाणं गायलं.
किशोर कुमार यांचा स्वभाव अत्यंत मुडी स्वरुपाचा होता. जर ते खूपच मूडमध्ये असतील तर एकाच वेळेत ते संपूर्ण गाण रेकॉर्ड करायचे. पण जर त्यांना एखादं गाण आवडेलेलं नसेल तर त्यांना कितीही पैसे दिले तरी ते गाणे गात नसतं.
किशोर कुमार यांच्या घराबाहेर एक खास साईन बोर्ड लावलेला होता. ज्यावर लिहिलं होतं की, 'बिवेअर ऑफ किशोर'. याच संदर्भात एक किस्साही आहे की, जेव्हा निर्माता-दिग्दर्शक एच एस रवैल एकदा त्यांची भेट घेऊन घरातून बाहेर पडत होते तेव्हा किशोर कुमार यांनी त्यांच्या हाताला चावा घेतला. त्यावर रवैल यांनी त्यांना असं का केलं हे विचारलं तर किशोर यांनी म्हटलं, माझ्या घरात घुसण्याआधी तुम्ही बाहेरचा बोर्ड वाचायला हवा होता.
किशोर कुमार आज आपल्यात नसले तरी त्यांनी आपल्या गायकीनं अजरामर केलेली अनेक गीतं अजरामर झाली आहेत. राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर यांच्या आराधना या चित्रपटातील सर्वच गाणी हिट झाली होती. पण यातील 'मेरे सपनों की रानी कब आएगी तू' हे गाणं आजही खूपच लोकप्रिय आहे.
सौंदर्यवती आणि अभिनय सम्राज्ञी मधुबालाशी किशोर कुमार यांनी विवाह केला होता. या दोघांचं नात मात्र दोघांच्याही घरच्यांना पसंत नव्हतं. तर मधुबालाच्या घरच्यांचं मन वळवण्यासाठी किशोर कुमार यांनी आपला धर्मही बदलला होता.
लग्नानंतर काही दिवसातच मधुबाला यांना हृदयात छिद्र असलेल्याचे समजले. त्यानंतर तब्बल ९ वर्षे त्यांनी या आजाराशी लढा दिला आणि अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. या काळात कोणतही काम करत नसल्यानं मधुबाला नैराश्याच्या गर्तेत ओढली जात होती. तर पत्नीच्या चेहऱ्यावर हास्य दिसावं यासाठी किशोर कुमार धडपडत होते. जेव्हा मधुबाला हसायची तेव्हा मी हसायचो आणि ती रडायची तेव्हा मी ही रडायचो असं किशोर कुमारनं एकदा सांगितलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Russia Relations: ''भारत-रशिया मिळून दहशतवादाला चोख उत्तर देणार'', परराष्ट्र मंत्र्यांचा रशियातून इशारा

Farmer ID : फार्मर आयडी नोंदणीत गोंधळ; सातबारा एकाचा, आधार लिंकिंग दुसऱ्याचे!

MP Nilesh Lanke : पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी; खासदार नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

Maharashtra Latest News Update: विधीमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीची खोपोली ते कुसगाव या मिसिंगलिंक प्रकल्पास भेट

Mokhada News : जगण्यासाठी छळ, मरणानंतर यातना; मोखाड्यातील आदिवासींच्या नशिबाचे दुष्टचक्र

SCROLL FOR NEXT