नागपूर : मध्ययुगीन व उत्तर मध्ययुगीन काळात विदर्भावर (vidarbha) वेगवेगळ्या राजवंशांनी आपल्या सत्ता स्थापन केल्या व किल्ले बांधले. मध्ययुगीन कालखंडात म्हणजे इ. स. १२-१३ व्या शतकात राजकीय घडामोडींमुळे विदर्भात मोठ्या प्रमाणावर किल्ले बांधणीला (forts in vidarbha) सुरुवात झाली. विदर्भात जवळजवळ असे एकूण ३० किल्ले आहेत. त्यापैकीच काही किल्ले आज आपण पाहणार आहोत. (know all about forts in vidarbha)
गवलिगड किल्ला : गविलगड हा किल्ला चिखलदऱ्याजवळ मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये आहे. किल्ल्याच्या भोवती घनदाट जंगल आहे. १२ व्या / १३ व्या शतकात गवळी बांधवांनी हा किल्ला बांधला होता. गाविलगड हा वैभवशाली बांधकाम असलेला किल्ला विदर्भाचे भूषण आहे. नगरधन किल्ला : नगरधन किल्ला हा नागपुरातील रामटेक तालुक्यात असून रामटेकपासून जवळपास ७ किलोमीटर अंतरावर आहे. हा किल्ला भुईकोट प्रकारातील असून त्याला जुना इतिहास आहे. नगरधन गावाच्या पश्चिमेस या किल्ल्याचे प्रवेशद्वार आहे. नगरधनच्या भव्य दरवाजावर काही शिल्पे अंलकृत केलेली आहेत.सिताबर्डी किल्ला : हा किल्ला नागपूर शहरात आहे. येथील टेकडीचे रुपांतर इंग्रजांनी किल्ल्यात केले. या किल्ल्यावर तोफखाना व दारुगोळा राहत होता. हा किल्ला नंतर लष्कराच्या ताब्यात देण्यात आला. वर्षात फक्त तिनदा, २६ जानेवारी व १५ ऑगस्ट व १ मे रोजी याचा काही भाग जनतेसाठी खुला करण्यात येतो.अकोला किल्ला : अकोला शहरातील हा भुईकोट किल्ला असदगड नावाने ओळखला जातो. हा खरे तर किल्ला नसून संरक्षक तटबंदीचा बुरूज आहे. या तटबंदीस कधीकाळी असद बुरूज, फतेह किवा पंच बुरूज, अगरवेस बुरूज असे एकूण तीन बुरूज होते. त्यापैकी पहिले दोनच शिल्लक आहेत. असद बुरूजालाच असदगड म्हणून ओळखले जाते.पवनीचा किल्ला : हा किल्ला विदर्भातील भंडारा जिल्ह्यात असून भंडारा शहरापासून ४७ आणि नागपूरपासून ८२ किलोमीटर अंतरावर आहे. पवनी गावाच्या तीन बाजूनी टेकड्या आणि एका बाजूने वैनगंगा नदी वाहते. त्यांपैकी एका टेकडीवर पवन राजाचा हा किल्ला आहे.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.