सध्या देशभरात वाढत असलेल्या डिझेल आणि पेट्रोलच्या किंमतीची झळ अनेक सामान्य ग्राहकांना सोसावी लागत आहे. त्यामुळे दररोज खासगी वाहन वापरणे अनेकांच्या खिशाला जड जात आहे. याचाच परिणाम म्हणून सध्या अनेक लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. हे पाहता गेल्या काही दिवसांपासून इलेक्ट्रिक स्कूटर चर्चेत आले आहेत. अलीकडेच अनेक वाहन कंपन्यानी इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारात सादर केले आहेत. आज आपण अशाच काही बेस्ट इलेक्ट्रिक स्कुटर बद्दल जाणून घेणार आहोत.
Bajaj Chetak - बजाज ऑटोची इलेक्ट्रिक स्कूटर चेतकला भारतीय ग्राहकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्राहक ही स्कूटर मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत.
Bajaj Chetak बाजारात दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे, ज्यात अर्बन आणि प्रीमियम व्हेरियंटचा समावेश आहे. कंपनीने बाजारात या स्कूटरची किंमत ही एक लाख रुपयांपासून होते. एका चार्जमध्ये हे स्कूटर 95 किमी पर्यंत चालू शकते. तसेच इको मोडमध्ये 85 किमी पर्यंतची रेंज देते.Ola Electric Scooter- ओला इलेक्ट्रिक स्कूटर एस 1 आणि एस 1 प्रो नुकतेच प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आले आहेत. एस 1 इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 99,999 रुपये आहे, तर एस 1 प्रोची एक्स-शोरूम किंमत 129,999 ही रुपये ठेवण्यात आली आहे. TVS iQube - TVS iQube इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये तुम्हाला 4.4kW इलेक्ट्रिक मोटर देणयात आली आहे. तसेच यात 2.25kWh क्षमतेचा लिथियम-आयन बॅटरी पॅक आहे. कंपनीच्या दाव्यानुसाप, ही स्कूटर एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 75 किमीचे अंतर कापू शकते. याची बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी सुमारे 5 तास लागतात. TVS iQube इलेक्ट्रिक स्कूटरची टॉप स्पीड 78 kmph असून ही स्कूटर फक्त 4.2 सेकंदात 40 किलोमीटर प्रति तास वेग गाठू शकते. या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 1 लाख रुपये आहे.Okaya Freedum Electric Scooter -
ओकाया फ्रीडम इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 69,999 रुपयांपासून सुरु होते. नुकतेच ही स्कूटर भारतात लाँच करण्यात आली आहे. ओकाया फ्रीडम सीरीजचे स्कूटर पांढरा, लाल, निळा, काळा, हिरवा, डिप येलो आणि ग्रे अशा 12 कलर व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आले आहेत. फ्रीडम सीरिजमध्ये आपल्या ग्राहकांना स्टाईलिश लुक आणि चांगली बॅटरी रेंज देणारे हे इलेक्ट्रिक स्कूटर परवडणाऱ्या किमतीत खरेदी करता येईलRead latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.