सूर्यनमस्कार आणि त्यामुळे आपल्या आरोग्याला होणाऱ्या फायद्यांबद्दल आपल्यापैकी प्रत्येकाला माहिती आहे. मात्र हे सूर्यनमस्कार करताना अनेकजण चुकीच्या पद्धतीनं करतात. यामुळे आपल्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतात. पण आता चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला अचूक सूर्यनमस्कर कसे करावेत हे काही फोटोंच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप समजवणार आहोत. (Know step by step procedure to do Suryanamskar Yoga)
1) तुमच्या योगा मॅटच्या पुढील बाजूस उभे रहा, पाय एकत्र ठेवा, शरीराचे वजन दोन्ही पायांवर सारखे ठेवा. छाती पुढे करा आणि खांद्यांना आराम द्या. श्वास आत घेताना दोन्ही हात बाजूने वरती घ्या आणि श्वास बाहेर सोडताना दोन्ही तळहात छाती पुढे एकत्र आणून प्रार्थना मुद्रेमध्ये उभे रहा.2) श्वास घेताना हात वरती आणि थोडे मागे घ्या,तुमचे दंड कानाच्या जवळ असू द्या. ह्या मुद्रेमध्ये आपले पूर्ण शरीर-पायांच्या टाचांपासून हाताच्या बोटांपर्यंत, वरच्या बाजूला ताणण्याचा प्रयत्न करा.
3) श्वास सोडताना कंबरेपासून पाठीचा कणा सरळ ठेवत, पुढच्या बाजूला खाली वाका. श्वास पूर्णपणे सोडल्यानंतर तुमचे तळहात खाली जमिनीवर पायांच्या बाजूला टेकवा.4) श्वास घेत तुमचा उजवा पाय जास्तीत जास्त जमेल तेवढा मागे घ्या.उजव्या पायाचा गुडघा जमिनीला टेकवून वरती मान वळवून पहा.5) श्वास घेत डावा पाय मागे घ्या आणि आपले संपूर्ण शरीर एका रेषेत ठेवा.6) हळूवारपणे गुडघे जमिनीवर आणत श्वास बाहेर सोडा. हळूवारपणे थोडे मागे घ्या आणि शरीर थोडे पुढे घ्या, छाती, हनुवटी जमिनीवर आरामात ठेवा. तुमचा पार्श्व भाग थोडा उंचवा. दोन्ही हात, दोन्ही पाय, दोन्ही गुडघे, छाती आणि हनुवटी हे शरीराचे आठ भाग जमिनीला स्पर्श झाले असायला हवेत.
7) पुढे सरका आणि छातीला वर उंचवा जणू एक फणा काढलेला नाग. या अवस्थेत तुम्ही तुमचे हाताचे कोपर वाकवू शकता, खांदे हे कानापासून दूर ठेवा.8) श्वास सोडत आपले माकडहाड वरती घ्या, छाती खालच्या बाजूला घ्या. शरीराचा आकार इंग्लिशमधील उलटा /\ सारखा करा.9) श्वास घेत आपला उजवा पाय पुढे आणत दोन्ही हातांच्या मधे ठेवा, डावा गुडघा जमिनीवर ठेवा, पार्श्वभाग खाली खेचा.10) श्वास सोडत आपला डावा पाय पुढे आणा.तळहात जमिनीवर ठेवा. वाटलेच तर गुडघे थोडे वाकवू शकता.11) श्वास घेत पाठ सरळ करा आणि हात वरती उंचवा. मागच्या बाजूला वाकण्याचा प्रयत्न करा.12) श्वास बाहेर सोडत पहिल्यांदा शरीर सरळ करा आणि मग हात खाली घ्या. या अवस्थेमध्ये विश्राम करा.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.