कोल्हापूर: "अंबा माता की जय' असा टिपेला पोचलेला जयघोष, करवीर नाद ढोलताशा पथकाचा ठेका, ब्रास बॅंडची सुरावट, गुलालाची उधळण, नयनरम्य आतषबाजी, विविधरंगी प्रकाशझोतांनी उजळून निघालेल्या रथोत्सव मार्गावर रेखाटलेल्या आकर्षक रांगोळ्या, रथावर पृष्पवृष्टी करण्यासाठी आसुसलेली मनं, अशा सळसळत्या उत्साहात आज श्री अंबाबाईचा रथोत्सव साजरा झाला. कोल्हापूरकरांचा लोकोत्सव म्हणजे काय असतो, याची प्रचीती यंदाही या सोहळ्याने दिली. दरम्यान, कोरोनामुळे दोन वर्षे या सोहळ्यावर निर्बंध होते. मात्र, यंदा कोणत्याही निर्बंधाशिवाय हा सोहळा झाल्याने कोल्हापूरकरांनी अलोट गर्दी केली. याचे संकरलन केले आहे छायाचित्रकार-बी.डी.चेचर यांनी.
चैत्र यात्रेच्या दुसऱ्या दिवशी हा सोहळा होतो. सायंकाळी पाचच्या सुमारास चांदीचा रथ महाद्वार दरवाजात आणला. त्यावर आकर्षक विद्युतरोषणाई केली.बिनखांबी गणेश मंदिर ते गुजरी कॉर्नर आणि गुजरी कॉर्नर ते आझाद चौक या मार्गावर आकर्षक रांगोळ्या सजू लागल्या.दरम्यान, श्री अंबाबाईची उत्सवमूर्ती चांदीच्या रथावर आरूढ झाली. रात्री नऊच्या सुमारास पालकमंत्री सतेज पाटील, माजी आमदार मालोजीराजे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्या उपस्थितीत रथाचे पूजन होऊन रथोत्सवास प्रारंभ झाला. महाद्वारातून रथ बाहेर पडताच नयनरम्य आतषबाजीला प्रारंभ झाला. पारंपरिक वाद्यांच्या निनादात गुजरीमार्गे रथ पुढे सरकत होता आणि ठिकठिकाणी पुष्पवृष्टीसह प्रसादवाटप, सरबतवाटपही सुरू झाले. रात्री रथ महाद्वारातून मंदिरात आला आणि प्रदक्षिणेने उत्सवाची सांगता झाली. दरम्यान, बालगोपाल तालीम परिसरात बाबासाहेब कासीम मुल्ला यांनी रथोत्सवावर अखंड पुष्पवृष्टी केली. मुल्ला बाराइमाम मोहल्ल्यातील गैबी पीर संस्थापक असून वीस वर्षांहून अधिक काळ ते ही सेवा देतात. न्यू गुजरी मित्रमंडळातर्फे स्वागत झाले. आतषबाजी, रांगोळ्या, प्रसाद वाटपाबरोबरच मंडळातर्फे व्हाईट आर्मीला रेस्क्यू बोट प्रदान केली. महालक्ष्मी भक्त मंडळातर्फे प्रसाद वाटपाबरोबरच जोतिबा रोडवर करवीर नाद ढोलताशा पथकाने रथोत्सवाचे स्वागत झाले. शिवप्रेमी आझाद मंडळातर्फे गुजरी कॉर्नर येथे श्री अंबाबाईची प्रतिमा उभारली होती. तेथेही सेल्फीसाठी गर्दी झाली. कोल्हापूरकरांचा लोकोत्सव म्हणजे काय असतो, याची प्रचीती यंदाही या सोहळ्याने दिली. दरम्यान, कोरोनामुळे दोन वर्षे या सोहळ्यावर निर्बंध होते. मात्र, यंदा कोणत्याही निर्बंधाशिवाय हा सोहळा झाल्याने कोल्हापूरकरांनी अलोट गर्दी केली. याचे संकरलन केले आहे छायाचित्रकार-बी.डी.चेचर यांनी. Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.