कोल्हापूरच्या कोणत्याही गोष्टीचं वर्णन 'जगात भारी कोल्हापुरी' असंच केलं जातं. कोल्हापूर गावाचे नाव ऐकलं तरी लगेच डोळ्यासमोर रांगडी भाषा, कुस्तीची परंपरा, तांबडा-पांढरा रस्सा, कोल्हापुरी साज आणि कोल्हापुरी चप्पल दिसते.
कोल्हापुरी चप्पल्स टिकाऊ, वापरासाठी आरामशीर व रंगाने आकर्षित आहेत.या चपला कोल्हापूर शहराच्या प्रमुख आकर्षणांपैकी एक आहे. या चपला भारतीय व भारताबाहेरील ग्राहकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. बाजारात सध्या या चपलामध्ये अनेक व्हरायटीज पाहायला मिळत आहेत. त्याला मागणी सुध्दा मोठ्याप्रमाणात मिळतीय. अतिशय जुनी आणि पिढीजात ओळख असलेली कोल्हापुरी चप्पल म्हणजे कोल्हापूरची शान. एक कोल्हापुरी चप्पल तयार होण्यासाठी साधारण 12 टप्पे असतात. चामडे कमावण्यापासून ते चप्पल तयार होण्यापर्यंत एक चप्पल किमान 12 जणांच्या हातातून जाते. अखेरचा हात फिरविताना त्याला गोंडे आणि इतर कलाकुसर केली जाते.मूळ कोल्हापुरी चपलेचा रुबाब तसाच ठेवत ती आणखी आकर्षक बनली आहे.कोल्हापूरला आलेली पाहुणे मंडळी कोल्हापुरी चप्पल खरेदी केल्याशिवाय परतत नाहीत . कोल्हापुरी चपलांना परदेशी खूप मागणी आहे.कोल्हापुरी चपला पायाची सौंदर्यता वाढवतात.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.