पुणे : अनेकांना भ्रमंती करायला खूप आवडते. जर तुम्हाला कुटुंबासोबत भारत भ्रमंती करायची असेल तर तुम्ही एकापेक्षा एक भारतातील पर्यटन स्थळे फिरु शकता. चला तर मग भारतातील काही मान्सून डेस्टिनेशनविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात.
अल्मोडा : जर तुम्हाला फिरायला जायचं आहे . तर तुम्ही उत्तराखंडच्या हिमालय पर्वतामधील अल्मोडामध्ये कुटुंबासोबत फिरून येथील पर्यटन स्थळाचा आनंद घेऊ शकता. यासोबतच इथून काही अंतरावर असलेले जीरो पॉईंट आणि डियर पार्क सुद्धा पाहू शकता. खाज्जिअर : मिनी स्विटरजरलैंड नावाने प्रसिद्ध असलेले हिमाचल प्रदेश येथील खाज्जिअर हे पर्यटन स्थळ अनेकांचे आवडीचे आहे. कुटुंबासोबत फिरण्यासाठी हे बेस्ट डेस्टिनेशन आहे. दार्जीलिंग : येथे आल्यावर तुम्ही येथील परिसर आणि चहाच्या बागेत फिरण्याचा आनंद घेऊ शकता. तसेच कुटुंबासोबत फिरण्यासाठी दार्जीलिंगला भेट देणे हे बेस्ट डेस्टिनेशन ठरू शकते. पंचमढी : मध्य प्रदेश येथील एक प्रसिद्ध हिल स्टेशन जो लहान मुलांना फिरण्यासाठी सर्वात आवडीचा आहे. तसेच तुम्ही पांडव गुफा, राजेंद्रगिरी, सनसेट पॉंईट अशा ठिकाणी सुद्धा फिरून येऊ शकता. माळशेज घाट : ट्रेंकिंग डेस्टिनेशन नावाने ओळख असलेली माळशेज घाट हा खूप प्रसिद्ध आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत इथे जाऊ शकता. माळशेज घाट हा परफेक्ट डेस्टिनेशन म्हणून ओळखला जातो. मुळशी : महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील मुळशी गावामध्ये आजूबाजूला अनेक पर्यटन स्थळे आहेत. तुम्ही कुटुंबासोबत येथील पर्यटन स्थळाचा आनंद घेऊ शकता. तसेच येथील वरसगाव बांध, तेमगढ बांध याठिकाणी सुद्धा तुम्हाला फिरता येईल. Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.