Leo Kalyan with Sonam Kapoor Instagram
सोनम कपूरच्या (Sonam Kapoor)डोहाळे जेवणाचे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. पण या फोटोंमध्ये सोनमसोबत दिसलेल्या एका व्यक्तीची जोरदार चर्चा रंगली आहे. नेटकरी आता तो नेमका कोण आहे याविषयी जाणून घ्यायला उत्सुक आहेत. सोनम कपूरच्या डौहाळे जेवणात वन पीस घातलेला एक कलाकार दिसतोय. त्यानं आपल्या आवाजानं म्हणे सोनमच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाची रंगत वाढवली.सोनम कपूरच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात लियो कल्याणला खास निमंत्रित केलं गेलं होतं. कदाचित आपल्यापैकी कमी जणांना माहित असेल लियोविषयी.लियो कल्याण हा एक ब्रिटिश पाकिस्तानी गायक आहे. तसंच तो गीतकार,संगीतकार आणि प्रोफेशनल मॉडेल देखील आहे. आपल्या आवाजाच्या जादूनं लोकांना मंत्रमुग्ध करणारा लियो अशी त्याची ओळख आहे.लियोला लहानपणापासून गाण्याची आवड होती. वयाच्या १३ व्या वर्षापासून त्यानं गायला सुरुवात केली. पण त्याच्या कुटुंबाची त्याला साथ नव्हती. त्यामुळे कितीतरी वर्ष तो कुटुंबाला याबाबतीत काहीही न सांगता गाणं गात होता. Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.