जगात एखादी समस्या जितकी समस्या मोठी असते तितकचं लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. अशीच एक समस्या आहे शरणार्थींची आहे. कित्येक मुलांचे आयुष्य त्यामुळे उद्ध्वस्त झाले आहे. याच संकटाचे आपले दुख सांगण्यासाठी एक 3.5 मीटर उंच बाहुली फिरत आहे. ही बाहुली म्हणजे सिरियातील शरणार्थी मुलीची प्रतिकृती आहे.
सध्या ही बाहूली ब्रिटेनमध्ये पोहचली आहे. लंडन येथील सेंट पॉल कॅथेड्रलमध्ये तिचे उत्साहात स्वागत झाले. या बाहुलीला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. गर्दीमध्ये सहभागी झालेली लहान-मोठे, '' अमाल, अमाल'' म्हणून ओरडत होते. लिटील अमाल असे या बाहुलीचे नाव आहे. बाहुली अमाल प्रत्येक ठिकाणी चालत जाते आहे. 'द वॉक' या आंतराष्ट्रीय प्रोजेक्ट अंतर्गत ही बाहूली बनविण्यात आली होती. लिटील अमालला हँडस्प्रिंग पपेट कपनींने तयार केले आहे. ही बाहुली जिथे जिथे जाते तेथील लोक तिला पाहून आनंदी होतात आणि तिचं दुखं ऐकून रडूही लागतात.अरबी भाषेमध्ये अमाल म्हणजे आशा असे आहे. आमाल नावाची ही बाहुली शरणार्थिंची गोष्ट जगाला सांगत आहे. विशेषत: त्या लहान मुलांचे दुख: ज्यांना आपले घर सोडून दुसऱ्या जागी शरण व्हावे लागले. (Syria Refugee Amal Puppet). ज्या मुलांना आपल्या सुरक्षिततेसाठी कित्येक मैलांचा प्रवास करावा लागतो आणि ज्यांच्या मुलभूत गरजा देखील पूर्ण होत नाही. ब्रिटनपर्यंत पोहचण्यासाठी ८ हजार किमी प्रवास पूर्ण केला आहे. त्यासाठी तिने तोच मार्ग निवडला जो युद्धग्रस्त देशांमधून पलायन करण्यासाठी शरणार्थी वापरतात. आयोजकांचे म्हणणे आहे की ,''त्यामुळे लोकांमध्ये सहानुभूती राहील आणि कोणत्याही शरणार्थींनी सर्वकाही कसे सहन केले याचा विचार करण्याची संधी मिळेल.''अमाल ग्रीस, इटसी, फ्रान्स, स्विझरलँड, जर्मनी आणि बेल्जियम येथून ब्रिटनमध्ये पोहचली आहे.अमालने ने कित्येक शहर आणि नगरांमध्ये लोकांना आकर्षित केले (Syria Refugee Crisis). अमालने आपला प्रवास 27 जुलैला तुर्की येथून सुरू केला होता. ती 3 नोव्हेंबरला मॅनचेस्टरमध्ये आपला दौरा पूर्ण करण्याआधी कँटरबरी, ऑक्सफर्ड, कोवेंट्री, बर्मिंघम, शेफील्ड आणि बार्न्सलचा दौऱा करणार आहे.व्हिक्टोरीया आणि अल्बर्ट (Refugee Children). संग्रहालयामध्ये अमाल जन्मदिनाची पार्टीसाठी खूप साऱ्या लहान मुलांना आमंत्रित केले आहे. Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.