बॉलिवूडची 'धक-धक गर्ल' अभिनेत्री माधुरी दीक्षित सध्या सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असल्याचे चित्र आहे.
बॉलिवूडची 'धक-धक गर्ल' अभिनेत्री माधुरी दीक्षित सध्या सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असल्याचे चित्र आहे. गेली अनेक दिवस ती सोशल मीडियावर आपले खास फोटो शेअर करत आहे. ती तिच्या चाहत्यांमध्ये चर्चेत राहण्यासाठी दररोज 'मनोरंजक' पोस्ट शेअर करताना दिसतेय. अलीकडेच माधुरी पुन्हा एकदा अशाच काही कारणांमुळं प्रकाशझोतात आलीय.माधुरी दीक्षितनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लेटेस्ट फोटोशूटची काही छायाचित्रं शेअर केलीयत. या फोटोंमध्ये ती पारदर्शक निळ्या रंगाची साडी परिधान केलेली दिसतेय.माधुरीनं परिधान केलेली ही सुंदर साडी विविध रंगांच्या फुलांनी सजलेली दिसत असून तिनं या पोशाखावर दागिनंही परिधान केलेत. त्यामुळे ती आणखीनच खुलून दिसत आहे.या फोटोशूटमध्ये माधुरी खूपच सुंदर दिसतेय. या पोशाखात तिची केशरचना देखील अप्रतिम अशीच दिसत आहे.माधुरी दीक्षितची ही छायाचित्रे चाहत्यांना खूप आवडत आहेत. त्यामुळेच तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.माधुरीच्या या सिझलिंग स्टाईलला चाहत्यांकडून भरपूर प्रतिक्रिया मिळत आहेत. यासोबतच अनेक सेलिब्रिटी देखील कमेंट करताना तिची स्तुती करताना दिसताहेत.माधुरीचे हे फोटो पाहून एका चाहत्यानं लिहिलंय, 'अप्सरा हो तुम या कोई परी'.. तर दुसऱ्या एका चाहत्यानं लिहिलंय, की माधुरी सौंदर्याच्या बाबतीत अनेक अभिनेत्रींशी स्पर्धा करू शकते. माधुरी दीक्षितनं याआधीही तिच्या ग्लॅमरस शैलीनं चाहत्यांना वेड लावलंय.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.