फोटोग्राफी

बेळगावात समितीच्या अध्यक्षांवर भ्याड हल्ला; मराठी भाषिक संतप्त

परिणामी मंगळवारी अनेक भागांत बंद पुकारण्यात आला आहे.

मिलिंद देसाई

कर्नाटक सरकारच्या अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या महामेळाव्याला आडकाठी घालण्याचा प्रयत्न कर्नाटक पोलिसांकडून सुरू झाला आहे. यामुळ या भागातील मराठी भाषिक संतप्त झाले आहेत. परिणामी मंगळवारी अनेक भागांत बंद पुकारण्यात आला आहे. बेळगावसह खानापूर देखील बंद राहणार आहे.

मंडप घेण्यासाठी परवानगी घेण्यात आलेली नाही असे कारण सांगत व्हॅक्सिन डेपो परिसरात घालण्यात आलेला मंडप काढण्यासाठी पोलिसांकडून दगडफेक केली जात आहे.
कोणत्याही परिस्थितीत मेळावा यशस्वी करण्याचा निर्धार मोठ्या संख्येने जमलेल्या समिती कार्यकर्त्यांतून केला जात आहे.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्या अंगावर काळी शाई टाकून कन्नडीग पळून गेल्यामुळे बेळगावात वातावरण तापले आहे.
मराठी भाषिकांचा विरोध असतानाही कर्नाटक सरकारकडून गेल्या काही वर्षांपासून बेळगावात अधिवेशन घेतले जात आहे.
डेपो परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ठीकठिकाणी कार्यकर्त्यांची अडवणूक केली जात असून सकाळपासूनच कार्यकर्ते मोठ्या संख्येने मेळाव्यासाठी दाखल होऊ लागले आहेत.
याबाबत मराठी भाषिकातून तीव्र संताप व्यक्त केला जात या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी बेळगाव बंद पुकारण्यात आला आहे.
मंगळवारी बेळगावसह खानापूर देखील बंद असणार आहे. तालुक्यातील गावेही बंद राहणार आहेत. टिळकवाडी पोलीस स्थानकावर जाणार मोर्चा सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MBBS Admission: एकाच छताखाली वैद्यकीय शिक्षणाचे धडे; ‘सकाळ विद्या’ आणि ‘वे टू ॲडमिशन’ यांच्यातर्फे पाच शहरांत होणार चर्चासत्र

UP: योगी सरकारकडून १७ कंपन्यांना हिरवा कंदील; २ हजार कोटींची गुंतवणूक आणि १० हजार नोकऱ्यांचा धमाका!

बायको Irritate झाली तर काय करायचं? भाऊ कदम यांनी सांगितलं सिक्रेट, म्हणाले...

Latest Marathi News Live Update: - खत दरवाढीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, अनिल देदेशमुखांची घणाघाती टीका

Whatsapp News : फक्त 4 महिने उरले! 8 सप्टेंबरपासून 'या' मोबाईलवर व्हॉट्सॲप बंद; कंपनीचा मोठा निर्णय, पाहा यादीत तुमचा फोन आहे का?

SCROLL FOR NEXT