Maharashtra Kesari esakal
फोटोग्राफी

Maharashtra Kesari: 'उसकी हार के चर्चे जीत से ज्यादा' पराभवानंतरही सिकंदरचीच हवा

रुपेश नामदास
काल नुकतीच पुण्यात ६५ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत पुण्याच्या शिवराज राक्षे याने महेंद्र गायकवाडला चितपड करत महाराष्ट्र केसरीची गदा मिळवली. शिवराज जिंकला त्याची वावा होतच आहे. मात्र सेमी फायनलमध्ये महेंद्र गायकवाड कडून पराभव पत्कारावा लागलेल्या सिकंदर शेखची हवा सोशल मीडियावर होत आहे.
सिकंदर मुळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचा. घरात आजोबापासूंनचा कुस्तीचा वारसा. पण या वारशावर दारिद्राची गडद छाया कायमची. घरात वडील रशिद शेख पैलवानकी करायचे.
सिकंदर शेखने मागील वर्षीचा माजी महाराष्ट्र केसरी बाला रफीक शेखला सिकंदर आसमान दाखवत चितपट करत खुल्या गटातून माती विभागातील सेमी फायनलमध्ये प्रवेश केला होता.
माती विभागातील सोलापूरचा सिकंदर शेख आणि पुण्याचा महेंद्र गायकवाड यांच्यात उपांत्य सामना पार पडला. हा सामना अतिशय थरारक असा बघायला मिळाला. अखेर महेंद्र गायकवाडचा विजय झाला. पण सोशल मीडियावर सिकंदरवर अन्याय झाला याची जोरदार चर्चा रंगली आहे.
घरात असणाऱ्या अठराविश्‍वे दारिद्रातून कुस्तीतला प्रवास करत एका हमालाचा पोरगा अखंड कुस्तीशौकीनांच्या गळ्यातील ताईत बनला आहे.
आता पर्यंत देशभरात कुस्त्या लढून सिंकदरने बक्षिसांची लयलूट केली आहे. यामध्ये एक महिन्द्रा थार चारचाकी, एक जॉन डिअर ट्रक्टर, चार अल्टो कार, चोवीस बुलेट, सहा टिव्हीस, सहा सप्लेंडर तर तब्बल चाळीस चांदी गदा त्याने आपल्या नावावर केल्या आहेत.
६५ वी राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती स्पर्धेत शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाडला अवघ्या काही मिनिटातच अस्मान दाखवले. त्याने महाराष्ट्र केसरी जिंकली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT