फोटोग्राफी

लग्नात पैठणी नेसण्याचा विचार करताय, हे वाचाच...

भक्ती सोमण-गोखले

महाराष्ट्रीयन लग्नात आवर्जून नेसली जाते ती पैठणी. जेवढं मोरांच डिझाईन बारीक आणि जास्त तेवढी त्याची किंमत वाढत जाते. 2 हजारांपासुन मिळणाऱ्या सेमी पैठणीपासून लाखोंच्या घरात पैठण्या मिळतात. त्यात आता विविध प्रकारही मिळायला लागले आहेत.

पारंपारिक पैठणी - पारंपारिक पैठणीवर फक्त पदरावरच नक्षीकाम असते अर्थात जेवढी किंमत जास्त तेवढे त्यात बारीक काम आणि सिल्क असते. यात विविध प्रकार पहायाला मिळतात. पारंपारिक पैठणी मुख्यत्वे नेसली जाते. या पैठण्यांमध्ये फक्त मोरच नाही तर इतरही प्रकार पाहायला मिळतात.
ब्रोकेड पैठणी- सध्या ब्रोकेड पैठणीचा ट्रेंड आहे.  संपूर्ण साडीवर असणारी नक्षी, रंग हे अधिक उठावदार आणि आकर्षक असतात. तर ब्रोकेड पैठणीवर संपूर्ण साडीवर नक्षीकाम केलेले आढळते.ब्रोकेड पैठणी साडी किंमत साधारणतः दहा हजारापासून सुरू होते.
बनारसी पैठणी- बनारसी साडी आणि पैठणी साडी याचे कॉम्बिनेशन म्हणजे ही पैठणी आहे. या साडीत बनारसी साड्यांचे पॉलिश आणि पैठणीचे डिझाईन्स असे कॉम्बिनेशन असते. दिसायला एकदम रीच असलेली ही साडी लग्नात एक उत्तम पर्याय आहे.
मोरबांगडी - मोरबंगडी म्हणजे बांगड्यांच्या आकारातील मोर. या सिल्कच्या साडीतील पदरावर एकच किंवा अनेक छोटे मोरे असतात. काही वेळा एकच नृत्य करणारा मोर डिझाइन केलेला आहे. या मोटिफचा वापर केल्यामुळे साड्यांची किंमत साधारण सात हजारांपेक्षा जास्त असते.
मुनिया ब्रोकेडः मुनिया म्हणजे पोपट. पोपटे पदारावर तसेच साठीच्या काठावर विणले जातात. पोपट हिरव्या रंगात असतात. जेवढे पोपट आणि सिल्क जास्त तेवढी पैठणीची किंमत जास्त असते. 
कमळ ब्रोकेड: पदरावर तसेच काहीवेळा कधीकधी सीमेवर कमळाचे स्वरुप वापरले जातात. कमळाच्या आकारात 7-8 रंग असतात.
सेमी पैठणी - या साडीच्या मागच्या बाजूला जाळी असते. सेमी पैठणी साधारण 1500 पासून मिळतात. ज्यांना पैठणी घेण्याची आवड आहे मात्र खिशाला परवडत नाही, त्यांच्यासाठी सेमी पैठणी हा चांगला आणि उत्तम पर्याय आहे.
कॉटन पैठणी - सुळसुळीत पैठणीपेक्षा कॉटन पैठणी नेसण्याचा कल वाढत आहे. अगदी व्यवस्थित चापूनचोपून बसणारी अशी ही साडी एखाद्या कार्यक्रमात नेसल्यावर तुम्हाला आकर्षकही दिसते. सहसा या साड्यांची अधिक खरेदी होत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT