MS Dhoni 41th Birthday sakal
फोटोग्राफी

MS Dhoni 41th Birthday: 'माही'चे ही पाच रेकॉर्ड मोडणे खूप कठीण

धोनीने कर्णधारपद, फलंदाजी आणि यष्टिरक्षणाच्या बळावर क्रिकेट विश्वात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.

Kiran Mahanavar

MS Dhoni 41th Birthday: भारताचा महान कर्णधार महेंद्रसिंग धोनी आज त्याचा 41वा वाढदिवस साजरा करत आहे. महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपद, फलंदाजी आणि यष्टिरक्षणाच्या बळावर क्रिकेट विश्वात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. या खास प्रसंगी महेंद्रसिंग धोनीचे हे पाच विक्रम जाणून घेऊया. जे कोणाला मोडणे कठीण आहे.

3 ICC ट्रॉफी जिंकणारा जगातील एकमेव कर्णधार - माहीच्या नेतृत्वाखाली भारताने 2007 मध्ये टी-20 विश्वचषक जिंकला होता, तर 2011 मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली भारताने दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकला होता. यानंतर 2013 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावण्यातही भारताला यश आले होते. त्यानंतर तीनही आयसीसी ट्रॉफी जिंकणारा धोनी एकमेव कर्णधार ठरला.
सर्वाधिक स्टंपिंगचा विक्रम - फलंदाजी आणि कर्णधारपदाव्यतिरिक्त धोनी त्याच्या स्टंपिंगसाठीही ओळखला जातो. त्याने सर्वाधिक 192 वेळा खेळाडूंना स्टंप केले आहे. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक स्टंपिंग करणारा यष्टिरक्षक आहे.
कर्णधार म्हणून रेकॉर्ड - धोनीने सर्वाधिक वेळा भारताचे कर्णधारपद भूषवले आहे. त्याने 60 कसोटी, 200 एकदिवसीय आणि 72 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे. याशिवाय तो भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे.
यष्टिरक्षक फलंदाजाची वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या - धोनीने 2005 मध्ये जयपूरमध्ये श्रीलंकेविरुद्ध नाबाद 183 धावांची खेळी केली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणत्याही यष्टिरक्षक फलंदाजाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे.
धोनी हा जगातील एकमेव कर्णधार आहे ज्याने वनडे क्रिकेटमध्ये सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना शतक झळकावले आहे, त्याने हे शतक 2012 मध्ये पाकिस्तानविरुद्ध केले होते. यादरम्यान त्याने 113 धावांची खेळी खेळली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT