फोटोग्राफी

Photo: काय सांगता 'ही' मैंने प्यार किया मधली भाग्यश्री आहे?

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडमध्ये 90 च्या दशकामध्ये त्या अभिनेत्रीनं सर्वांची मनं जिंकून घेतली होती. सध्याचा बॉलीवूडचा भाईजान सलमान खान याच्याबरोबर ती मैंने प्यार किया मध्ये ती झळकली होती. त्यानंतर तिनं चित्रपटापासून लांब राहणं पसंद केलं. ती नेहमी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. आपल्या वेगवेगळ्या फोटोंमधून तिनं चाहत्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. सध्या तिचं एक फोटोशुट चाहत्यांच्या पसंतीस पडलं आहे. त्यातील तिचा तो लूक पाहून ही खरचं भाग्यश्रीच आहे का, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडल्यावाचून राहणार नाही.

भाग्यश्रीनं (Bhagyashree) वयाची 50 ओलांडली आहे. असं असलं तरी तिचं सौंदर्य काही कमी झालेलं नाही. सध्या तिचा जो फोटो व्हायरल झाला आहे त्यात ती 18 वर्षांची वाटत आहे.

निरागस चेहरा, त्या चेहऱ्यावर कायम असणारं हसू यामुळे भाग्यश्रीनं बॉलीवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तिला फार काळ टिकाव धरता आला नाही.

सध्या सोशल मीडियावर भाग्यश्रीचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. त्यात तिनं जो ड्रेस परिधान केला आहे त्यावरुन तिला चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

भाग्यश्रीच्या त्या बोल्ड फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे. आता तिच्या त्या फोटोंची तुलना सारा अली खान आणि जान्हवी कपूरच्या फोटोंशी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhule Lok Sabha Constituency : मुस्लीम उमेदवारांच्या प्रभावाचीही कसोटी; राजकीय डावपेच कुणाच्या पथ्यावर?

PM Modi: 'अदानी-अंबानींकडून किती संपत्ती गोळा केली, त्यांना शिव्या देणे का थांबवले?' पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला प्रश्न

नातीसाठी आजोबांनी 8 वर्षे दिला लढा, अखेर सामूहिक बलात्कार करणाऱ्या 4 गुन्हेगारांना 25 वर्षे तुरुंगवास

Viral Video: लिफ्टमध्येच कुत्र्याचा मुलीवर हल्ला, चावा घेताच...; पाहा अंगावर काटा आणणार व्हिडिओ

Met Gala 2024 : मेट गालाची थीम कोण ठरवत? जाणून घ्या यंदाची थीम आणि बरंच काही..!

SCROLL FOR NEXT