भारतात असे अनेक तलाव आहेत ज्यांचे अस्तित्व भारतासाठी चमत्कारीक आहे. उदाहरणार्थ, Spiti Valley यातील चंद्रताल तलाव 'चांद की झील' म्हणून लोकप्रिय आहे.आणखी एक तलाव 'रूपकुंड तलाव' म्हणून ओळखला जातो जो कंकालच्या तलावाच्या नावाने लोकप्रिय आहे. हे दोन्ही तलाव हिमालयाच्या (himachal pradesh) सभोवताल आहेत. या दोन्ही तलावांप्रमाणेच हिमालयात सध्या अस्तित्वात असलेले मनिमहेश तलाव 'ज्वेल ऑफ शिव' या नावानेही लोकप्रिय आहे. दरवर्षी लाखो पर्यटक या तलावाला आणि त्याच्या आसपासच्या ठिकाणांना भेट देतात. या लेखात, आम्ही तुम्हाला मनिमहेश तलावाबद्दल बारकाईने सांगणार आहोत, चला तर मग जाणून घेऊया..
मणिमहेश तलाव :
हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात समुद्रसपाटीपासून 4 हजार मीटरपेक्षा जास्त उंचीवर मणिमहेश तलाव अस्तित्त्वात आहे. 'शिवाचे आभूषण 'म्हणून ओळखल्या जाणार्या या तलावाला मानसरोवर तलावासारखेच महत्त्व आहे. या तलावावर जाण्यासाठी पर्यटक आणि यात्रेकरूंना सुमारे 13 किलोमीटर चालत जावे लागते. जेव्हा हिमवृष्टी होते तेव्हा मात्र हा तलाव पर्यटनांस बहुतेक वेळा बंदच राहतो.मणिमहेश तलावाची स्टोरी:
या प्रसिद्ध तलावाशी एक नव्हे तर अनेक कथा संबंधित आहेत. दंत कथेनुसार असे मानले जाते की, देवी पार्वतीशी लग्न केल्यावर भगवान शिवने हे तलाव तयार केले होते.आणखी एक कथा अशी की येथे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे स्वर्गीय स्थान होते. दुसर्या आख्यायिकेमध्ये हा तलाव शिव तपश्चर्याशी संबंधित दिसतो. (चंद्राचा तलाव म्हणून प्रसिद्ध असलेला तलाव) मणिमहेशचा शाब्दिक अर्थ 'शिवाचे आभूषण ' आहे. म्हणूनच हा तलाव शिवाच्या अलंकाराच्या नावाने देखील लोकप्रिय आहे.पर्यटनांसाठी खास:
कदाचित तुम्हाला माहित असेलच, वर्षातून एकदा मणिमहेश यात्रा देखील होते. जिथे लाखो यात्रेकरू दर्शनासाठी जातात. लोकांचा असा विश्वास आहे की, या तलावाच्या पवित्र पाण्यात बुडवून घेतल्याने सर्व त्रास दूर होतात. जन्माष्टमी ते राधाष्टमी दरम्यान सुमारे 15 दिवसांचा प्रवास ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये होतो. या प्रवासाची सुरुवात चंब्यातील लक्ष्मी नारायण मंदिर मार्गे सुरुवात होऊन मणिमहेश तलावावर हा प्रवास संपतो.मणिमहेश तलावाकडे जाण्याचा रस्ता:
मणिमहेश तलावाकडे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक म्हणजे स्पिती मार्गे येथे पोहोचू शकता.
दुसरा मार्ग हा हसदर-मणिमहेश मार्गापासून हडसर गाव आणि हडसर गावापासून दुसर्या हसदार-मणिमहेश रस्त्यामार्गे सुमारे 13 किलोमीटर अंतरावर आहे.
तिसरा मार्ग- जर तुम्ही पायी किंवा कारने जाऊ शकत नसाल तर हेलिकॉप्टरमधून देखील येथे पोहोचू शकता. हेलिकॉप्टरने जाण्यासाठी तुम्हाला 8-10 हजार रुपये खर्च करावे लागतील.
जर तुम्ही हिमाचल प्रदेशला भेट देण्याचा विचार करत असाल तर या हिमालयातल्या मणिमहेश तलावाला नक्कीच भेट द्या.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.