sankarshan karhade first photo shoot  sakal
फोटोग्राफी

संकर्षण कऱ्हाडेने पहिल्यांदाच केलं फोटोशूट, म्हणाला...

अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याने पहिल्यांदाच फोटोशूट केले असून एका खास कॅप्शनसह हे फोटो शेअर केले आहे.

नीलेश अडसूळ

अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (sankarshan karhade) हे नाव आता अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक झालं आहे. 'महाराष्ट्राचा सुपरस्टार' या मालिकेतून त्याने झी मराठी च्या मंचावर पाऊल ठेवलं आणि उत्तरोत्तर प्रगती केली. अगदी छोट्याशा भूमिकेपासून ते प्रमुख भूमिका इथपर्यंत त्याने बाजी मारली. शिवाय कविता, नाट्यलेखन अशी त्याची मुशाफिरी सुरूच आहे. सध्या तो झी मराठी (zee marathi) वरील 'माझी तुझी रेशीमगाठ' (majhi tujhi reshimgath) आणि 'किचन कल्लाकार' (kitchen kallakar) या मालिकांमध्ये काम करत असून त्याने आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच फोटोशूट केला आहे. (sankarshan karhade first photoshoot)

अभिनय क्षेत्रात यायचं म्हंटलं कि तुमचा पोटोंशी अगदी जवळून संबंध येतो. अनेक कलाकार दर काही दिवसांनी फोटोशूट करत असतात. पण संकर्षणने मात्र पहिल्यांदाच हा फोटोशूट चा घाट घातला आहे.
या फोटोंना संकर्षणने भन्नाट कॅप्शन दिले आहे. तो म्हणतो, 'माझ्या आयुष्यातलं पहिलं फोटोशूट आहे. त्यामुळे Pose , Expressions सगळ्याचेच वांदे होते '
'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतील समीर हे पात्र संकर्षणने साकारले आहे. सध्या समीर हा यश,नेहा,परी या व्यक्तिरेखांइतकाच मराठी प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरला आहे.
'जन्माला आल्यावर पोलिओ DOSE आणि फोटोशूट करतांना ही POSE… कंपल्सरी असते..' असेही कॅप्शन त्याने या फोटोंना दिले आहे.
झी मराठी वरील बहुचर्चित 'किचन कल्लाकार' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालनही संकर्षण करतो आहे. याशिवाय त्याच्या 'तु म्हणशील तसं' या नाटकालाही प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI Deepfake Rules : बनावट व्हिडिओ अन् बातम्या पसरवाल तर थेट तुरुंगात जाल! संसदेत AI डीपफेक कायद्यावर मोठा निर्णय, नक्की वाचा

पाकिस्तानचे प्रेक्षकही पलटले! संघ हरतोय दिसताच हिरव्या जर्सीवर चढवली टीम इंडियाची जर्सी; Viral Video

Supreme Court : वक्फ कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, 'या' तरतुदींना दिली स्थगिती, संपूर्ण कायदा रद्द करणार?

Mumbai Rain: मुंबईत विजांसह ढगांचा गडगडाट! पुढील ३ तास महत्त्वाचे, हवामान विभागाचा 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट

...अन् आईचे अश्रू बदलले आनंदाश्रूत, नऊ महिन्यांच्या बाळाने गिळलेली सेफ्टी पिन डॉक्टरांनी काढली बाहेर

SCROLL FOR NEXT