Hruta Durgule, Sonali kulkarni, Isha keskar Instagram
सोशल मीडिया हा प्रत्येकाच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. सेलिब्रिटींसाठी सोशल मीडिया हे त्यांच्या चाहत्यांसोबत संवाद साधण्याचं एक महत्त्वाचं माध्यम आहे. विविध फोटो, व्हिडीओ पोस्ट करत ते आपल्या खासगी आयुष्यातील बऱ्याच गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करतात. अनेक मराठी सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर त्यांच्या नात्याची घोषणा करून चाहत्यांना सुखद धक्का दिला. हृता दुर्गुळेपासून ईशा केसकरपर्यंत असे कोणते कलाकार आहेत, ते पाहुयात..
'मन उडु उडु झालं' फेम हृता दुर्गुळे हिने नुकतंच इन्स्टाग्रामवर दिग्दर्शक प्रतीक शाहसोबतचं नातं जाहीर केलं आहे. तिने प्रतीकसोबतचा फोटो पोस्ट करत लिहिलं, 'मला तुझ्यामध्ये एक नवीन आशा मिळाली, जी मला कधीच माहिती नव्हती.' प्रतीक शाह हा दिग्दर्शक असून त्याने अनेक हिंदी मालिकांचं दिग्दर्शन केलं आहे.'काहे दिया परदेस' या मराठी मालिकेत शिवची भूमिका साकारणाऱ्या ऋषी सक्सेनाने इन्स्टाग्रामवर आपल्या रिलेशनशिपबद्दल सांगितलं होतं. ऋषीने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीद्वारे ईशासोबतच्या नात्याची घोषणा केली. त्यांनी व्हॅलेंटाईन डेचं औचित्य साधत चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली होती.मराठमोळं जोडपं म्हणजे सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांनी त्यांच्या नात्याची घोषणा करण्यापूर्वी सोशल मीडियावर अनेक फोटो पोस्ट केले होते. नंतर या दोघांनी व्हॅलेंटाईन डेनिमित्त इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट केले.आदिश वैद्य आणि अभिनेत्री रेवती लेले यांनी काही वर्षांपूर्वी सोशल मीडियावर त्यांच्या नात्याची घोषणा केली होती आणि तेव्हापासून ते लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. आदिश आणि रेवती सोशल मीडियावर त्यांचे रोमँटिक फोटो नेहमी पोस्ट करत असतात.'लग्नाची वाईफ वेडिंगची बायको' या मालिकेतील अभिनेता विजय आंदळकर याने सहकलाकार रुपाली झनकरसोबत साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत रुपालीसोबतचं नातं जाहीर केलं होतं. लोकप्रिय मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने कुणाल बेनोडेकरसोबत साखरपुड्याचे फोटो पोस्ट करत, नात्याची घोषणा केली. तिच्या चाहत्यांसाठी आणि सहकाऱ्यांसाठी ही खरोखरच धक्कादायक बातमी होती. नंतर लॉकडाऊन दरम्यान कुटुंबीयांच्या उपस्थितीत सोनालीने दुबईत कुणालशी लग्न केलं.ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.