prajakta mali photoshoot sakal
फोटोग्राफी

PHOTO : लव लव करी पातं.. प्राजक्ता माळीचे लव्हली फोटो..

अभिनेत्री प्राजक्ता माळीने निसर्ग ही थीम घेऊन एक खास फोटो शूट केला आहे.

नीलेश अडसूळ

अनेक लोकप्रिय मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता माळी (prajakta mali) सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या सोनी मराठीवरील विनोदी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतेय. तिची लडीवाळ भाषा आणि साधेपणा कायमच प्रेक्षकांना भावत आला आहे. 'जुळून येती रेशीमगाठी' या तिच्या झी मराठीवरील मालिकेने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं. तिच्या कवितांवरही चाहते प्रेम करत आहेत. नुकतेच प्राजक्ताने निसर्गाच्या सानिध्याच एक फोटशूट केले असून त्याला कॅप्शन म्हणून कवीतेच्या ओळी दिल्या आहे.

नुकत्याच आलेल्या 'चंद्रमुखी' चित्रपटात प्राजक्ताने नैना चंद्रापुरकर या लावण्यवतीची भूमिका साकारली आहे. तिची सवाल जवाबाची लावणी चांगलीच गाजली.
सध्या प्राजक्ता आणखी एका प्रकरणामुळे चर्चेत आहे. ते म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना उघड पाठिंबा. भोंगे कधी बंद होणार याची ती आतुरतेने वाट पाहत आहे. या संदर्भात तिने आपले विचार खुलेपणाने व्यक्त केले आहेत.
नुकत्याच येऊन गेलेल्या 'पावनखिंड' या चित्रपटातही प्राजक्ताचा पारंपरिक अंदाज समोर आला होता.
या फोटोंना तिने ‘ऋतू बरवा’ या गाण्यातील ‘थरथरत्या अधरावर, प्रणयी संकेत नवा..ऋतू हिरवा, ऋतू बरवा…’ या ओळींचे कॅप्शन दिले आहे.
याच फोटोंना कॅप्शन देताना प्राजक्ताने कवियत्री नाव ‘शांता शेळके’ यांचे नाव चुकून ‘शांती शेळके’ असे लिहिल होते. यावरुन तिला जोरदार ट्रोल केले गेले.
असे असले तरी फोटोंमधील प्राजक्ताचा मनमोहक अंदाज पाहून चाहते तिच्या रुपाला भुलले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Recruitment : एमपीएससीच्या कारभारावर आक्षेपांचा पाऊस ; नागपूर विभागातून सर्वाधिक ७, ६०० ई-मेल ; व्ही. राधा यांची माहिती

Asian Games Nagoya : भारतीय खेळाडूंच्या आगमनात अडथळे ; आशियाई क्रीडा स्पर्धा ; खेळाडूंना क्रुझवरील रूम्स मिळण्यासाठी कसरत

Pune Traffic: पुण्यात वाहतूक कोंडीवर मोठा प्रकल्प; एचसीएमटीआर आणि इनर रिंग रोडसाठी ३,७२२ कोटींच्या भूसंपादनाला मंजुरी

पतीसोबत वादात मदतीच्या बहाण्याने भाजपच्या माजी आमदारासह पोलिसाचा २२ वर्षीय तरुणीवर अत्याचार; भिवंडीत दोघांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : भाजपच्या माजी आमदारावर गुन्हा, मध्यरात्री तरूणीला फार्महाऊसवर बोलवून गैरकृत्य

SCROLL FOR NEXT