बिगबॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाला नुकतीच सुरवात झाली. नव्या स्पर्धकांपैकी स्नेहा तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे फारचं चर्चेत आहे. स्नेहाने तिने दोनदा लग्न केलं असून दोनदा तिचा घटस्फोट झाला आहे. यंदाच्या पर्वात स्नेहासोबतच तिचा पूर्वाश्रमीचा पती आविष्कार दारव्हेकरसुद्धा बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. दरम्यान, आता स्नेहा तिच्यापेक्षा 11 वर्षांनी डान्सरला डेट करत असल्याचीही चर्चा सुरु आहे.
मराठीसोबतच हिंदी मालिकांमध्ये भूमिका साकारलेली अभिनेत्री स्नेहा वाघने 'बिग बॉस मराठी ३'मध्ये एण्ट्री केली आहे.स्नेहाचा जन्म मुंबईत कल्याण येथे झाला. तिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती.अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी तिला नृत्यशाळा सुरु करायची होती. मराठीसोबतच हिंदी मालिकांमध्ये भूमिका साकारलेली अभिनेत्री स्नेहा वाघने 'बिग बॉस मराठी ३'मध्ये एण्ट्री केली आहे.स्नेहाने 2004 मध्ये अधुरी एक कहानी या मालिकेतून मराठी टेलिव्हिजनमध्ये प्रवेश केला तर 2009 मध्ये तिने 'ज्योती' या हिंदी मालिकेतून हिदी टेलिव्हिजन प्रवेश केला होता.हिंदी टेलिव्हिजनवरील 'वीर की अरदास विरा'(2017) या प्रसिध्द हिंदी मालिकेत रतन संपूर्ण सिंग'''ची भूमिका साकारली होती. स्नेहा साकरलेल्या रतन या पात्राला प्रेक्षकांकडून खूर प्रेम मिळालेत्यानंतर स्नेहाने 'शेर ए पंजाब महाराजा रणजीत सिंग'मध्येही(2017) महाराणी राज कौरची भुमिका साकारली होती. त्यानंतर मेरे साई (2018)मध्ये तुलसीची तर चंद्रगुप्त मोर्यमध्ये महाराणी मुराची भूमिका साकारली होती.2020 मध्ये कहत हनुमान जय श्री राम या मालिकेमध्ये अंजनी देवींची भूमिकाही स्नेहाने साकारली आहे.
2014 मध्ये स्नहा सेलिब्रिटी क्रिकेट लीगमध्ये सहभाग घेतला होता. बॉक्स क्रिकेड लीगच्या जयपूर जोशिले टिमची ती सदस्य होती. 2016 मध्ये ती 'पुरी पटोला' या म्युझिक व्हिडिओमध्येही दिसली होती. स्नेहाचं वैवाहिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिलं. तिने दोनदा लग्न केलं असून दोनदा तिचा घटस्फोट झाला आहे.वयाच्या १९व्या वर्षी स्नेहाने आविष्कारशी लग्नगाठ बांधली होती. मात्र लग्नाच्या काही वर्षांनंतर हे दोघं विभक्त झाले. स्नेहाने आविष्कारवर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप केलेआविष्कारला घटस्फोट दिल्यानंतर सात वर्षांनी स्नेहाने दुसऱ्या लग्नाचा निर्णय घेतला. इंटेरिअर डिझायनर अनुराग सोलंकीसोबत तिने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. मात्र हे लग्नसुद्धा फार काळ टिकलं नाही. आठ महिन्यांतच स्नेहा आणि अनुराग विभक्त झाले.दरम्यान, आता स्नेहा तिच्यापेक्षा 11 वर्षांनी लहान मुलाला डेट करत असल्याची ही चर्चा सुरु आहे. डान्सर आणि अभिनेता फैजल खानलासोबत डेट करत असल्याची जो मात्र ही अफवा असल्याचं दोघांनी स्पष्ट केलं आहे. चंद्रगुप्त मोर्य मालिकेदरम्यान दोघेही एकत्र काम करत होते. Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.