mazhi tujhi reshmigath : neha and yash engagement photo  sakal
फोटोग्राफी

PHOTO : प्रार्थना बेहेरेचा पुन्हा साखरपुडा.. नेहा- यश अडकणार लग्नबंधनात

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत परीचे सत्य उघड झाले असून आजोबांनी यश-नेहाच्या साखरपुड्याला मान्यता दिली आहे.

नीलेश अडसूळ

majhi tujhi reshimgath : 'झी मराठी' वाहिनीवर अत्यंत लोकप्रिय मालिका 'माझी तुझी रेशीमगाठ'चा चाहतावर्ग खूप मोठा आहे. या मालिकेतील यश आणि नेहाची जोडी तसंच परीचा निरागस अभिनय या गोष्टींनी प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. मालिकेत आता लवकरच यश आणि नेहा यांच्या नव्या नात्याची सुरुवात होणार आहे. परी ही नेहाची मुलगीअ असल्याचे आजोबांना समजल्यावरही आजोबा यश आणि नेहाच्या नात्याचा स्वीकार करतात. लवकरच त्यांचा साखरपुडा होणार असून त्याचे खास फोटो सकाळच्या हाती आली आहे. यानिमित्ताने अभिनेत्री प्रार्थना बेहेरे (prarthana behere) रील लाईफमध्येही साखरपुडा अनुभवणार आहे.

या मालिकेत एक वेगळाच ट्विस्ट पहायला मिळतोय. परी नेहाची मुलगी आहे पण हे यशाच्या आजोबांना माहित नाही. त्यांना वाटतंय नेहाचे शेजारी बंडू काका यांची परी नात आहे. तसेच यश आणि नेहाचं लग्न झालं आहे असेही आजोबाना वाटत आहे.
परीच घरात असणं आजोबांसाठी उल्हासदायी ठरतंय. इतकच काय तर तिच्या असण्याने घरातील बरीच नाती सुधारताना दिसत आहेत. हे पाहून आजोबांनी परीला दत्तक घेण्याचे योजिले आहे.
विश्वजित आणि मिथिलाच्या ऍनीव्हर्सीनिमित्त परीला त्यांच्यासाठी आपण दत्तक घेत आहोत अशी आजोबा घोषणा करतात. हे ऐकून सर्वांनाच धक्का बसतो. पण यश परीचे नेहासोबतचे असलेले नाते आजोबांना सांगतो आणि काही वेळासाठी सगळं काही संपत का काय..? अशी भावना सर्वांच्याच मनात येते.
पण सुज्ञ विचारांनी आजोबा या नात्याचा स्वीकार करतात आणि पणती म्हणून परीचाही. यानंतर यश आणि नेहाचा साखरपुडा करण्याचे योजतात. येत्या काही भागांमध्ये त्यांचा साखरपुडा देखील होणार आहे. या खास प्रसंगांचे हे काही फोटो..
यावेळी नेहाने खास हिरव्या रंगाचा शालू नेसून फोटोशूट केलं आहे. लवकरच ते लग्नबंधनातही अडकतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Ghaywal Acquitted : निलेश घायवळसह सहा आरोपींची निर्दोष मुक्तता; मोका न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

Bank Holiday October 2026: ऑक्टोबरमध्ये बँका 16 दिवस बंद! महाराष्ट्रात किती दिवस सुट्टी? पाहा RBIची संपूर्ण यादी

Chiplun Municipality : चिपळूण नगरपालिकेत नोकरीसाठी 15 लाखांची मागणी? सत्ताधारी नगरसेवकाच्या गंभीर आरोपामुळे खळबळ, प्रशासनाचे स्पष्टीकरण

‘या’ राशींचे लोक असतात खूप जास्त इमोशनल, भावनेच्या भरात घेतात निर्णय, नंतर होतो पश्चात्ताप; त्यांच्या या स्वभावाचा फायदा घेतात लोक

Marathi News Live Updates: मुंबई-अहमदाबाद मार्गावर भीषण वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT