झी मराठी वाहिनीवर 'माझी तुझी रेशीमगाठ' ही नवी मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांच्या मुख्य भूमिका आहेत. या दोघांसोबतच चिमुकल्या मायरा वायकुळ हिनेही प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. या मालिकेतील कलाकार किती मानधन घेतात, ते जाणून घेऊयात..
या मालिकेद्वारे प्रार्थनाने तब्बल ११ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. प्रार्थनाने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. एका एपिसोडसाठी प्रार्थना जवळपास ३२ हजार रुपये मानधन घेते. अल्फा मराठी आणि झी मराठीवरील आभाळमाया आणि अवंतिका तसेच दूरदर्शनवरील दामिनी या गाजलेल्या मराठी मालिकांसोबतच हिंदी सिनेसृष्टीमध्ये नावलौकिक मिळवलेला लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदेनं मराठी टेलिव्हिजनवर पुनरागमन केलंय.या मालिकेच्या एका एपिसोडसाठी श्रेयस जवळपास ३८ हजार रुपये इतकं मानधन घेतोय. सोशल मीडियावर आधीच स्टार ठरलेली चिमुकली मायरा एका एपिसोडसाठी दहा हजार रुपये मानधन घेते. मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे एका एपिसोडसाठी जवळपास २८ हजार रुपये इतकं मानधन घेतो. Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.