Meena Kumari life story in Marathi  सकाळ डिजिटल टीम
फोटोग्राफी

Meena Kumari: फक्त ३८ वर्ष जगणाऱ्या ट्रॅजेडी क्वीनच्या आयुष्याचे 'हे' पैलू वाचलेत का?

लिवर सिरोसिस आजारानं ३१ मार्च १९७२ रोजी मीनाकुमारी यांचे निधन झाले.

सकाळ डिजिटल टीम

भारतीय चित्रपट सृष्टीत 'ट्रॅजेडी क्वीन' म्हणून ओळखल्या गेलेल्या अभिनेत्री मीनाकुमारी यांचा जन्म १ ऑगस्ट १९३२ रोजी झाला. मीना कुमारी या नावानं त्यांनी बॉलीवूडमध्ये ओळख मिळाली मात्र त्यांचं मूळ नाव 'महजबी बानो' असं होतं. फक्त ३८ वर्ष जगणाऱ्या मीनाकुमारी यांनी चित्रपट सृष्टीत मोठं नाव कमावलं. (Meena Kumari life story in Marathi)

मीना कुमारी यांनी बालकलाकाराच्या रुपात बॉलिवूडमध्ये काम करायला सुरवात केली. त्यानंतर ३० वर्षांच्या सिनेसृष्टीतील करिअरमध्ये त्यांनी जवळपास ९० पेक्षा जास्त सिनेमांत काम केले. त्या एक उत्तम नर्तिका सुध्दा होत्या.
मीना कुमारी भारतीय चित्रपट सृष्टीत खुप मोठा चेहरा होता. मीना कुमारी या गायिका तसेच कवयित्रीदेखील होत्या. शायरी करण्याची त्यांना प्रचंड आवड होती. मीना कुमारी यांच्या प्रोफेशनल लाईफसोबतच त्यांचं खासगी आयुष्याही कायमचं चर्चेत राहिले.
१९५२ साली मीनाकुमारींची प्रमुख भूमिका असलेला ‘बैजूबावरा’ हा चित्रपट गाजला अन् त्या मशहूर झाल्या. त्याच वर्षी त्यांनी कमाल अमरोही या त्यांच्याहून वयाने १५ वर्षांनी मोठा असलेल्या शायर दिग्दर्शकाशी लग्न केलं. पण वैचारिक मतभेदांमुळे १९६४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. मीनाकुमारी या धक्क्यातून सावरल्या नाहीत आणि त्या गंभीर आजारी झाल्या. त्यांना दारुचे व्यसन लागले.
१९५३ साली फिल्मफेअर पुरस्काराला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या दोन्ही वर्षी ‘बैजू बावरा’ आणि ‘परिणिता’ या चित्रपटांतील भूमिकांसाठी त्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरल्या होत्या. सुंदर अभिनयामुळं फिल्मफेअर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेल्या मीना कुमारी या पहिल्या अभिनेत्री ठरल्या.
 याकाळात त्यांना फार एकटे देखील वाटत होते. दिवस रात्र मद्याच्या आहारी गेल्याने,  लिवर सिरोसिस आजारानं त्यांना वेढलं. त्यानंतर त्या चांगल्या झाल्या, मात्र अचानक ३१ मार्च १९७२ रोजी त्यांच निधन झालं. त्यावेळी त्या, फक्त ३९ वर्षाच्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Western Railway: पश्चिम रेल्वेकडून गुडन्यूज! दिवाळी-छठपूजेसाठी विशेष गाड्यांची घोषणा; पाहा वेळापत्रक

PMC Bonus Scam : सुरक्षा रक्षकांना ना बोनस ना वेतन, ऐन दिवाळीत कर्मचारी हवालदिल; ठेकेदार महापालिकेला देईना दाद

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये कोणाच्याही प्रवासावर कोणतेही बंधन नाही - राम कदम

Dhaka Airport Fire Video : ढाका आंतरराष्ट्रीय विमानतळावर भीषण आग ; सर्व विमानांचे लँडिंग अन् टेकऑफ तातडीने थांबवले गेले!

New Year Horoscope Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी ! 2026 मध्ये 'या' 5 राशी होणार मालामाल

SCROLL FOR NEXT