meet the fitness freak marathi celeb file image
मराठी मालिका आणि चित्रपटामधील कलाकार त्यांच्या फिटनेसची विशेष काळजी घेत असतात. हे कलाकार त्यांच्या वर्कआऊटचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या वर्क आऊट सेशनचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. व्यायाम करताना सोनाली विविध प्रकारच्या प्रॉप्सचाही वापर करताना दिसते.'काहे दिया परदेस' या मालिकेमधून विशेष लोकप्रियता मिळवणारा कलाकार ऋषी सक्सेना नियमित वर्क आऊट करत असतो. त्याच्या फिटनेसमुळे तो अनेकांना प्रोत्साहित करतो. 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेमधील बबड्या ही भूमिका साकारणारा कलाकार आशुतोष पत्की त्याच्या फिटनेसची विशेष काळजी घेतो. विविध प्रकारचा व्यायाम करतानाचे फोटो आणि व्हिडीओ तो सोशल मीडियावर शेअर करतो. अभिनेत्री रूपाली भोसले तिच्या वर्कआऊटबद्दल आणि आहाराबद्दलची माहिती चाहत्यांना देत असते. आदिनाथ कोठारे देखील फिटनेस फ्रिक आहे. त्याच्या जिम लूकमधील फोटो तो सोशल मीडियावर शेअर करत असतो. मराठी चित्रपटसृष्टीतील हॅंडसम हंक म्हणून ओळखला जाणारा अभिनेता भूषण प्रधान फिटनेसबद्दलच्या टिप्स चाहत्यांना नेहमी देत असतो. अमृता खानविलकर योगासने करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते. Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.