Mercury Direct in Taurus Sakal
या राशीच्या लोकांना मिळेल यश- 3 जून रोजी बुध ग्रह शुक्राचं स्वामित्व असलेल्या वृषभ राशीत मार्गी होणार आहे. त्यामुळे अनेक लोक यशाच्या दिशेन मार्गक्रमण करू शकतात. बुधाचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल, परंतु पाच राशी विशेष लाभ मिळवू शकतात. त्या राशी कोणत्या आहेत, याबद्दल जाणून घेऊया.
1. कर्क राशीवर बुध मार्गाचा प्रभाव: बुध ग्रह तुमच्या राशीतून एकादश भावामध्ये मार्गी होतील. याला लाभाचे घर असेही म्हणतात. या राशीच्या लोकांना करिअरच्या क्षेत्रात लाभ मिळू शकतो. आत्तापर्यंत कोणतंही काम रखडलं असेल, तर तेही या काळात पूर्ण होऊ शकते. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतूनही तुम्हाला लाभ मिळू शकतो. तुमची कोणतीही इच्छा यावेळी पूर्ण होऊ शकते. या राशीचे लोक यावेळी तांत्रिक क्षेत्रातही यश मिळवू शकतात. जर तुम्ही आयटी क्षेत्रात काम करत असाल तर तुम्हाला प्रमोशन मिळू शकते.2. सिंह राशीवर बुध मार्गाचा प्रभाव: तुमच्या राशीमध्ये बुध दशम भावामध्ये मार्गी होतील. तुम्ही या काळात खूप सक्रिय दिसू शकता. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचा वेग लोकांना थक्क करू शकतो. जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत, त्यांची इच्छा देखील या काळात पूर्ण होऊ शकते. जर तुम्ही पालकांचा व्यवसाय करत असाल तर तुम्ही यावेळी व्यवसाय वाढवू शकता. जे व्यावसायिक इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा व्यवसाय करतात त्यांच्यासाठी हा काळ खूप चांगला आहे.3. कन्या राशीवर बुध मार्गाचा प्रभाव: बुध तुमच्या राशीचा स्वामी आहे. बुध मार्गी झाल्यामुळे या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुम्ही धार्मिक कार्यात भाग घेऊन सामाजिक स्तरावर तुमच्या चांगल्या वागणुकीने लोकांची मने जिंकू शकता. या काळात कुटुंबात काही शुभ कार्यही होऊ शकते. या काळात काही लोक आपल्या पालकांसोबत धार्मिक प्रवासाला जाऊ शकतात. 4. मकर राशीवर बुध मार्गाचा प्रभाव: बुध हा तुमच्या राशीचा स्वामी शनिचा मित्र आहे, त्यामुळे हे तुमच्यासाठी अनेक प्रकारे शुभ राहील. बुधाच्या मार्गामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढेल आणि तुम्हाला शैक्षणिक क्षेत्रात चांगले परिणाम मिळतील. तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेत भाग घेणार असाल तर त्यातही तुम्हाला यश मिळेल. प्रेमसंबंधांसाठीही हा काळ चांगला असेल, तुम्ही तुमच्या प्रेमाच्या जोडीदाराला तुमच्या मनातील गोष्टी उघडपणे सांगाल, ज्यामुळे या काळात परस्पर मतभेद दूर होऊ शकतात. काही विवाहित लोकांच्या आयुष्यात या काळात नवीन पाहुणे येण्याची शक्यता आहे.
5. कुंभ राशीवर बुध मार्गाचा प्रभाव: तुम्हाला कौटुंबिक जीवनात सकारात्मक बदल दिसू शकतात. तुमच्या आईसोबतच्या नातेसंबंधात तुम्हाला सुधारणा दिसेल. जमीन-इमारतीशी संबंधित वाद संपुष्टात येतील, तसेच तुम्हाला न्यायालयीन खटल्यांमध्ये यश मिळू शकते. मात्र, या राशीच्या लोकांनी वाहन चालवताना काळजी घ्यावी. काही लोकांना या काळात आईच्या बाजूच्या लोकांच्या मदतीने चांगली नोकरी मिळू शकते.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.