hacking 
फोटोग्राफी

मिस कॉल, SMS, Whats app शिवाय 7 पद्धतीने मोबाईल होऊ शकतो हॅक

कार्तिक पुजारी

राजकीय नेते, विरोधक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, उद्योगपत्री अशा सर्वांवर पाळत ठेवली जातेय. ही धक्कादायक बाब जगभरातील 16 माध्यम संस्थांनी केलेल्या संयुक्त आंतरराष्ट्रीय शोधपत्रकारिता प्रकल्पातून समोर आलीये. मोबाईल क्रमांकाचा वापर करुन लोकांवर पाळत ठेवली जातीये आणि यासाठी इस्त्रायलच्या पिगॅसस स्पायवेअर तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येतीये. आणखी कोणत्या माध्यमातून हेरगिली केली जाऊ शकते हे आपण पाहूया...

Pegasus स्पायवेअर पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. Pegasus स्पायवेअरचा वापर करुन लोकांची हेरगिरी केली जात आहे. या स्पायवेअरसह अन्य काही सॉफ्टवेअर आहेत ज्याच्या माध्यमातून लोकांना टार्गेट केलं जातं. लोकांच्या गोपनीयतेला कशा पद्धतीने बाधा पोहोचवली जाऊ शकते हे आपण पाहूया...
मिस्ड कॉलच्या माध्यमातून: मिस्ड कॉलच्या माध्यमातून Pegasus टार्गेटला लक्ष्य करते. 2019 मध्ये फेसबुकच्या जवळपास 1400 लोकांचा डेटा गहाळ करण्यात आला होता. युजरच्या अॅड्रॉईड किंवा आयओएस फोनवर केवळ मिस्ट कॉल देऊन ते हॅक केले जाते.
खोटे ऍप : सायबर गुन्हेगार आणि हॅकर्स सहसा हीच पद्धत वापरतात. याच्या माध्यमातून तुमच्या फोनला टार्गेट केलं जातं. युजरला मॅलेशियस ऍप किंवा दुसरे मालवेअर डाऊनलोड करायला लावलं जातं. असे ऍप थर्ड पार्टीचे असतात. सोशल मीडिया वेबसाईट किंवा दुसऱ्या लिंक्स द्वारे असे ऍप सापडतात.
व्हॉट्सऍप, ईमेल्स आणि एसएमएस: व्हॉट्सऍप, ईमेल्स आणि एसएमएस च्या माध्यमातून युजर्सला लिंक पाठवली जाते. युजर जेव्हा अशा लिंकवर क्लिक करतो तेव्हा त्याच्या फोनमध्ये व्हायरस किंवा सॉफ्टवेअर प्रवेश करतो. याच्या माध्यमातून युजर्सचा पर्नसल डेटा चोरला जातो.
सीम कार्ड: SIM कार्ड स्वॅप हॅकर्स तेव्हा वापरतात जेव्हा ते तुमची पर्सनल माहिती मिळवतात. यानंतर हॅकर्स तुमच्या टेलीकॉम ऑपरेटला संपर्क करतात आणि सीम रिप्लेसमेंटची मागणी करतात. नवा सीम ऍक्टिवेट झाल्यानंतर जुने सीम बंद होते. यामुळे हॅकर्सकडे तुमच्या नंबरचा पूर्ण अॅक्सेस असतो.
ब्लूटूथ हॅकिंग: याच्या मदतीने हॅकर्स जवळच्या डिवाईसला ब्लूटूथच्या मदतीने हॅक करतात. यासाठी ते स्पेशलाईज्ड सॉफ्टवेअरचा वापर करतात. अशा प्रकारची हॅकिंग साधारणपणे सार्वजनिक ठिकाणी होते. याच पद्धतीने सार्वजनिक Wi-Fi वापरल्यानंतही युजरला टार्गेट केले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

Katraj Issues : सोपानकाकानगरमध्ये नागरी सुविधांचा अभाव, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी; तीन वर्षांपासून करत भरुनही महापालिकेचे दुर्लक्ष

Agriculture News : ऊस पिकावर हुमणीच्या प्रादुर्भावाचा धोका; कृषी विभागातर्फे प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन

Women Empowerment: घरच नव्हे, गावही चालविणार! छप्पन्न गावांत लवकरच महिलाराज, १११ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

SCROLL FOR NEXT