Mithilesh Chaturvedi news esakal
Mithilesh Chaturvedi passed away : बॉलीवूडमध्ये आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीतील अभिनयानं प्रेक्षकांचे मन जिंकून घेणाऱ्या अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. वयाच्या 68 व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते हदयविकाच्या आजारानं त्रस्त होते. त्यांच्यावर उपचार देखील सुरु होते. मात्र त्या दरम्यान त्यांचा मृत्यु झाला. त्यांच्या जाण्यानं बॉलीवूडवर मोठी शोककळा पसरल्याचे दिसून आले आहे. मोठा संघर्ष करुन मिथिलेश यांनी आपली वेगळी ओळख बॉलीवूडमध्ये निर्माण केली होती.
मिथिलेश यांनी आपल्या करिअरची सुरुवात खूप उशिरा केली. मुंबईमध्ये येण्यापूर्वी ते एक थिएटर आर्टिस्ट देखील होते. मात्र त्यापूर्वी ते सरकारी कर्मचारी देखील होते. याविषयी फार कमी जणांना माहिती आहे. त्यांनी 1997 मध्ये आलेल्या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यु केले होते. बॉलीवूडमध्ये येण्यापूर्वी त्यांनी वेगवेगळ्या मालिकांमध्ये देखील भूमिका केल्या होत्या. याशिवाय ते स्कॅम 1992 या मालिकेत देखील दिसले होते. सोशल मीडियावर देखील त्यांचा चाहतावर्ग मोठा होता. एका मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितले होते की, चित्रपटात येण्यापूर्वी ते सरकारी कर्मचारी होते. 25 वर्षे नोकरी करुन त्यांनी आपल्या अभिनयाची आवड जोपासली. मुंबईमध्ये येण्यापूर्वी ते लखनऊमध्ये होते. आपण जेव्हा मुंबईमध्ये आलो तेव्हा याठिकाणी काम मिळण्यास खूप अडचणी आल्या. मी निराश झाला होतो. मात्र मी हार मानली नाही. लढत राहिलो. त्याचा फायदा असा की, वेगवेगळ्या माणसांशी ओळखी झाल्या. त्यातून संधी मिळाली. माझ्यासोबत डॅनी डेंगजोंग्पा होते. त्यांनी मला खूप साथ दिली. त्यांच्या सहकार्यामुळे खूप कामंही मिळाले. अशी आठवण मिथिलेश यांनी सांगितली. 1997 मध्ये मला भाई भाई नावाची फिल्म मिळाली. ज्याचा मला फायदा झाला.
मी खूप फिल्म केल्या नाहीत याला कारण माझा आळशीपणा. त्याचा अधिक तोटा झाला. मिथिलेश यांनी कोई मिल गयामध्ये ऋतिकच्या शिक्षकाची भूमिका केली होती. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.