MLA Rohit Pawar baramati news 
फोटोग्राफी

पॉवरफुल अदानी बारामतीत, आमदार रोहित पवारांनी केले 'सारथ्य'

अदानी यांना कार्यक्रम स्थळापर्यंत पोहचवण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या गाडीचं सारथ्य केलं

सकाळ डिजिटल टीम

आज प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या बारामतीत उपस्थित राहिले आहेत. राजीव गांधी सायन्स टेक्नॉलॉजी कमिशन, महाराष्ट्र सरकार आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने बारामतीत सायन्स अँन्ड इनोव्हेशन अॅक्टिविटी सेंटरचे उद्घाटन आज पार पडत आहे. दरम्यान, अदानी यांना कार्यक्रम स्थळापर्यंत पोहचवण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या गाडीचं सारथ्य केलं आहे. (MLA Rohit Pawar baramati news)

आज नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा उद्घाटन कार्यक्रम पार पडणार आहे. या उद्घाटनासाठी आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहिले आहेत.
यावेळी अदानी यांना कार्यक्रम स्थळापर्यंत पोहचवण्यासाठी आमदार पवार यांनी त्यांच्या गाडीच सारथ्य केलं आहे. सध्या सोशल मिडीयावर हे फोटो फिरत असून त्यावर कमेंट्सही येत आहेत.
बारामतीतील अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या आवारात हे सायन्स पार्क उभारण्यात आले आहे. याच्या उद्घाटनासाठी गौतम अदानी यांनी उपस्थिती लावली आहे.
राज्यभरात सध्या चर्चिला जात असलेल्या या सायन्स पार्कमध्ये मुलांच्या बौद्धिक कौशल्य व वैज्ञानिक जागृती वाढीसाठी वेगवेगळे प्रकल्प असणार आहेत.
या माध्यमातून शालेय देशात पासूनच विद्यार्थी स्वतंत्रपणे जगातील प्रत्येक कुतूहल असणाऱ्या गोष्टीविषयी आपल्या वेगळ्या सिद्धांताची मांडणी करु शकतील. त्यामुळे विद्यार्थ्यांत लहानपणीच वैज्ञानिक वृत्ती वाढीस लागेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
या सायन्स पार्कच्या उद्घाटनाच्या निमित्ताने दोन दिवसीय राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचाही आज समारोप होणार आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार रोहित पवार, खासदार सुप्रिया सुळेंसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
भविष्यात विद्यार्थ्यांना या केंद्रात उपलब्ध असणाऱ्या फन सायन्स गॅलरी, अॅग्रीकल्चरल गॅलरी, 3डी थिएटर, इनोव्हेशन हब, व्हर्च्युअल रियालिटी, ऑगमेंतेड रीलिटी अशा स्वरुपाचे तंत्रज्ञान येथे पाहायला मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT