paschim maharashtra celebrated as a non veg party 
फोटोग्राफी

काय पाऊस, काय गारवा अन् तांबडा-पांढरा रस्सा, एकदम झणझणीत!

सध्या सुरु असलेला रिमझिम पाऊस व हवेतील गारठा 'आकाडी पार्ट्यां'साठी पोषक ठरतोय

संतोष कणसे

कडेगाव (सांगली) : काय रिमझिम,काय गारवा अन काय तांबडा पांढरा ओक्केय. आषाढ महिना सुरु झाल्याने सर्वत्र 'आकडी पार्ट्यां' रंगू लागल्या आहेत. सध्या सुरु असलेला रिमझिम पाऊस व हवेतील गारठा 'आकाडी पार्ट्यां'साठी पोषक ठरत असून मांसाहारी खवय्ये झणझणीत तांबड्या पांढऱ्या रश्श्यावर ताव मारत असल्याचे चित्र सर्वत्र दिसू लागले. (paschim maharashtra celebrated as a non veg party)

आषाढ महिन्यामध्ये सर्वदूर पावसाचे आगमन होते. त्यामुळे हवेमध्ये मोठ्या प्रमाणात गारठा निर्माण होतो. अशा वातावरणात ग्रामीण भागात म्हसोबा, वीर, मागली आई, मरीआई आदी देवदेवतांना कोंबडा व बोकडाचा बळी देण्याची प्रथा आहे.
आषाढ महिन्यानंतर श्रावण महिना येतो हा महिना हिंदू धर्मियांमध्ये पवित्र मानला जातो. या महिन्यात विविध देवदेवतांची उपासना, पूजा, आराधना, व्रतवैकल्ये यांची मोठी रेलचेल असते.
यानंतर श्रावणातील दर सोमवारी अनेक ठिकाणच्या देवदेवतांच्या यात्रा असतात. त्यामुळे पवित्र अशा श्रावण महिन्यामध्ये बहुतांश हिंदूधर्मिय मांसाहार आहार करणे टाळतात.
परिणामी आषाढ महिन्यातच लोक मांसाहारी जेवणाचा पुरेपूर आस्वाद घेत असतात. तर आकाडीच्या पार्श्वभूमीवर सध्या ग्रामीण भागात देशी कोंबडा व बोकड खरेदी विक्रीची गडबड उडाली आहे.
साधारणपणे दहा किलोच्या बोकडाची किंमत पाच ते सहा हजारावर तर देशी कोंबड्याची किंमत ५०० ते ६०० रुपयांवर पोहोचली आहे. आकाडीच्या पार्श्वभूमीवर देशी कोंबडा व बोकडांची टंचाई भासू लागली आहे.
परिणामी, मिळेल तेथे व मिळेल त्या किंमतीला लोक देशी कोंबडा व बोकड खरेदी करुन आकाडी साजरी करण्याकडे ग्रामीण भागात कल दिसून येत आहे. आकाडीचे पै-पाहुणे व मित्रमंडळीना निमंत्रण दिले जात आहे.
सर्वत्र आकडीच्या निमित्ताने रात्रीच्यावेळी तांबड्या पांढऱ्या रश्श्यासह झणझणीत मटणाच्या जेवणावळी वाढू लागल्या आहेत.
तर अनेकांनी गटारी अमावस्येची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे सध्याच्या गारवा वातावरणात अनेक ठिकाणी आकाडीची 'धूम' पाहायला मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पगार वाढल्याशिवाय कामावर नाही येणार, कामगार ठाम; जाळपोळ आणि तोडफोड सुरूच, ७ FIR, ३०० जण ताब्यात

Kolhapur Danoli Crime : कोल्हापुरातील दानोळीमध्ये अपहरण करून खून, २५ लाखांची मागणी, भरतेशचा कारण नसताना बळी, घटनास्थळी आमदार यड्रावकर दाखल

Pune Crime: हवेली तालुक्यात जमिनीच्या वादातून शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; परस्पर विरोधात फिर्याद, ८ जणांविरुद्ध गुन्हा!

Latest Marathi News Update: नेस्कमधील कॉन्सर्टचा आणखी एक व्हिडिओ समोर, अनेकांनी ड्रिंक अँड ड्राईव्ह केल्याचा ही अंदाज

Pune Solapur flight: पुण्याहून सोलापूर आता ४० मिनिटांत पोहोचणे शक्य होणार; १ मेपासून स्टार एअरची विमानसेवा, नवीन स्लॉट मंजूर!

SCROLL FOR NEXT