साउथ चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री रश्मिका मंदानाला कोण ओळखत नाही. नॅशनल क्रश रश्मिका मंदाना हिने तिच्या क्युटनेसने चाहत्यांची मने जिंकली आहेत. रश्मिकाला साड्यांची एक वेगळीच ओढ आहे.
रश्मिका तिच्या सिंपल लूक आणि स्टाईलसाठी नेहमीच ओळखली जाते. रश्मिका कन्नड तेलुगु चित्रपटांची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. कमी वयात फिल्म इंडस्ट्रीमध्ये एंट्री केलेल्या रश्मिका मंदाना फॅशन सेन्सच्या बाबतीत अजिबात नवीन नाही. स्टाईलबाबत रश्मिका खूपच चुजी आहे. रश्मिकाची ड्रेसिंग सेन्स सिंपल आणि कम्फर्टेबल आहे. तसेच ती एक एलिगेंट लुक देते. तरीही नेहमीच रश्मिका मंदाना तिच्या स्टाईलसाठी प्रसिद्ध असते. रश्मिकाला साड्यांची एक वेगळीच ओढ आहे. तिचा साडीचा लुक सतत सोशल मीडियावर दिसून येतो, ज्याद्वारे ती लोकांचे लक्ष वेधून घेते. या फोटोमध्ये रश्मिका मंदाना सिंपल सुती साडी घातली असल्याचे दिसून येते. डार्क ब्राउन साडीला गोल्डन बॉर्डर आहे. या लूकमध्ये ती जितकी सिंपल आहे तितकीच क्यूट दिसत आहे. रश्मिका या फोटोमध्ये सिंपल मेकअपमध्ये साधेपणा आणि सुंदर स्मितसह पोझ देत आहे.रश्मिका मंदाना एक एक्ट्रेस तसेच एक मॉडेल आहे.रश्मिका मंदानाच्या या साडी लुकमधून तुम्हीही काही फॅशन हॅक टिप्स घेऊ शकता.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.