Mouni Roy Wedding News Updates
प्रसिद्ध टेलिव्हिजन आणि बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय गुरुवारी (२७ जानेवारी) लग्नबंधनात अडकणार आहे. गोव्यात प्रियकर सूरज नांबियार याच्याशी ती लग्नगाठ बांधणार आहे. मौनी-सूरज यांच्या हळद आणि मेहंदीच्या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.(Mouni Roy Wedding News Updates)
मौनीची खास मैत्रीण मंदिरा बेदीने या कार्यक्रमांना हजेरी लावली. टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानी आणि मौनी हे दोघंसुद्धा एकमेकांचे खास मित्र आहेत. टेलिव्हिजन आणि बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटींनी या कार्यक्रमात धमाल केली. 'देवों के देव.. महादेव' या मालिकेतून मौनीला प्रसिद्धी मिळाली. तिने 'नागिन' या मालिकेत अर्जुन बिजलानीसोबत काम केलं होतं. 'गोल्ड', 'केजीएफ: चाप्टर १', 'रोमियो अकबर वॉल्टर' आणि 'मेड इन चायना' यांसारख्या चित्रपटांमध्येही ती झळकली. सूरज हा दुबईमध्ये व्यावसायिक आणि बँकर म्हणून कार्यरत आहे. सूरज आणि मौनीची ओळख ही दुबईतच झाली होती. मौनी आणि सूरजवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.