Mouni Roy Marries Suraj Nambiar
अभिनेत्री मौनी रॉय लग्नबंधनात अडकली असून तिच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. (Mouni Roy Wedding Pics)
प्रियकर सूरज नांबियारशी तिने लग्नगाठ बांधली. दाक्षिणात्य पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला. गोव्यात पार पडलेल्या या लग्नसोहळ्याला काही सेलिब्रिटींनी हजेरी लावली.
मौनीची जिवलग मैत्रीण मंदिरा बेदीने तिच्या लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत. मौनी आणि सूरज गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. मौनीवर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मौनी आणि सूरजने या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. 'अखेर मी त्याला भेटले. हातात हात घालून, कुटुंब आणि मित्रांच्या आशीर्वादाने, आम्ही लग्न केलं. तुमच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची गरज आहे', असं कॅप्शन मौनीने दिलं. लग्नसोहळ्यातील मौनीच्या दाक्षिणात्य लूकची सोशल मीडियावर चर्चाछायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/मौनी रॉयRead latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.