फोटोग्राफी

नगरधन किल्ला; विदर्भातील महत्त्वाच्या किल्ल्यांत होते गणना

नीलेश डाखोरे

नागपूर : जिल्ह्यातील रामटेकपासून सुमारे सात किमी अंतरावर असलेला नगरधन किल्ला हा ‘भुईकोट’ प्रकारातील किल्ला आहे. वाकाटककालीन असलेल्या या किल्ल्यास जुना इतिहास आहे. इसवी सनाच्या चौथ्या शतकात ही जागा ‘नंदीवर्धन’ म्हणून ओळखली जात होती. नगरधन हा त्याचा अपभ्रंश आहे. नगरधन गावाच्या पश्चिमेस या किल्ल्याचे प्रवेशद्वार आहे. नगरधनच्या भव्य दरवाजावर काही शिल्पे अलंकृत केलेली आहेत. शिरोभागी गणेशाची प्रतिमा आहे. दोन्ही बाजूंना चषक कोरलेले आहेत. दाराच्या बाजूला द्वारपाल कोरलेले असून, त्यांच्या खांद्यावर कबुतर दाखवले आहे. दाराच्या आत पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. पूर्वी आत येणाऱ्यांची चौकशी व झाडाझडती येथेच घेतली जायची. प्रवेशदारातून आत गेल्यावर आयताकृती कक्ष लागतो. येथे आत हा भुईकोट आहे. तो गोंड राजाच्या वेळचा असावा. येथे एक पायऱ्यांची विहीरही आहे. (छायाचित्र - ललीत कनोजे) (Nagardhan-fort-was-counted-among-the-important-forts-in-Vidarbha)

नगरधन हा किल्ला भुईकोट किल्ला या प्रकारात मोडतो. विस्ताराने आणि आकाराने हा किल्ला जरी लहान असला तरी विदर्भातील महत्त्वाच्या किल्ल्यात याची गणना होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai News : मुंबईतील सीआयएसएफ मुख्यालयात जवानाने संपविले जीवन; धक्कादायक घटनेने गेवराईच्या तलवाड्यात शोककळा!

Astrological Prediction : उपराष्ट्रपती पदासाठी महाराष्ट्रातील नेत्याची निवड ते राज्य मंत्रिमंडळातील बदल; काय सांगत राजकीय भविष्य? वाचा...

Education News : शिक्षक नाहीत तर शाळा कशाला?"; आदिवासी पालकांचा संतप्त सवाल

MP Naresh Mhaske : उद्धव ठाकरेंचा असली चेहरा हा हिंदूंच्या विरोधी; खासदार नरेश म्हस्के यांची टीका

Shubhanshu Shukla : अंतराळवीर शुभांशु शुक्लांचा पृथ्वीवर परतल्यानंतरचा पहिला संवाद; वाचून तुमचाही उर अभिमानाने भरून येईल

SCROLL FOR NEXT