अंबाझरी हे नागपूर शहरातील एक पर्यटन स्थळ आहे. गेल्यावर्षी अंबाझरी तलाव हा याच काळात ओव्हरफ्लो झाला होता. त्यामुळेच बघ्यांची गर्दी देखील होती. यंदा मात्र विदर्भात पाहिजे त्या प्रमाणात मान्सून सक्रीय झाला नाही. त्यामुळे अंबाझरी तलाव अर्धवटच आहे. याच तलावाचे 'सकाळ'च्या छायाचित्रकाराने टिपलेले काही दृश्य -
अंबाझरी तलाव नागपूर शहरात असून तो शहराच्या पश्चिम भागात आहे. नागपूर शहरातल्या सुमारे ११ तलावांपैकी हा एक तलाव आहे. या तलावाचे पूर्वीचे नाव 'बिंबाझरी' असे होते.अंबाझरी तलवाच्या शेजारीच एक गार्डन आहे. त्याला अंबाझरी गार्डन म्हणतात. याठिकाणीही अनेक पर्यटकांची गर्दी असते.
दरवर्षी पावसाळ्यात हा तलाव ओव्हरफ्लो होतो. हा क्षण नागपूरकरांसाठी आनंदाचा असतो. अनेक पर्यटक अंबाझरीच्या ओव्हरफ्लो झालेल्या पाण्याचा मनसोक्त आनंद लुटतात.यंदा मात्र पाहिजे त्या प्रमाणात विदर्भात मान्सून सक्रीय झाला नाही. त्यामुळे अंबाझरी तलाव अद्यापही अर्धवटच भरला आहे.
कधी मुसळधार पाऊस येतो आणि कधी हा तलाव ओव्हरफ्लो होतो याची वाट पर्यटक पाहत आहेत. दररोज पर्यटक याठिकाणी भेट देतात. मात्र, त्यांची निराशा होते. Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.