ram navni esakal
फोटोग्राफी

दोन वर्षानंतर रामनवमीचा जल्लोष, पहा शोभायात्रेचे खास PHOTO

यंदा पश्चिम नागपूर नागरिक संघ श्रीराम मंदिरातून शोभायात्रा छोट्या प्रमाणात काढण्यात आल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

कोरोनामुळे सलग दोन वर्ष रामनवमीच्या पश्चिम आणि पूर्व नागपुरात काढण्यात येणाऱ्या शोभायात्रा रद्द करण्यात आल्या होत्या. यंदा पश्चिम नागपूर नागरिक संघ श्रीराम मंदिरातून शोभायात्रा छोट्या प्रमाणात काढण्यात आल्या आहेत. तर पोद्दारेश्वर मंदिराची शोभायात्रा रद्द करण्यात आली आहे. मात्र, श्रीरामनवमीनिमित्ताने रामझुल्याला ११ हजार दिव्यांनी सुशोभित करण्यात येणार आहे.

पोद्दारेश्वर शोभायात्रेची तयारी पूर्वीपासून करावी लागते. कोरोनाचे निर्बंध नुकतेच काढण्यात आल्याने कमी वेळात तयारी करणे अशक्य असल्याने शोभायात्रा स्थगित केली.
५३ वर्षापासून ही शोभायात्रा काढली जाते. नागपूरच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये या शेभायात्रेचा समावेश होतो. कोरोनामुळे सलग दोन वर्ष ही शोभायात्रा निघू शकली नाही. पोद्दारेश्वर मंदिराचे १०० वर्ष असल्याने यंदा शोभायात्रेची नागपूरकर आतुरतेने वाट पाहात होते.
रामनवमीला पहाटे पोद्दारेश्वर मंदिरात चार वाजता मंगलआरती, सकाळी सहा वाजता शृंगार आरती झाली. दुपारी १२ वाजता महाआरती आणि प्रसाद वितरण झाले.
पश्‍चिम नागपूर नागरिक संघाची शोभायात्रा उद्या रविवारी (ता. १०) सायंकाळी ५.३० वाजता निघणार आहे. या वर्षी दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे अयोध्येतील प्रभू श्रीरामचंद्राची प्रतिकृती व धनुर्धारी प्रभू श्रीराम असलेला चित्ररथ हे आकर्षणाचे केंद्र असणार आहे.
एकूण सहा चित्ररथांचा या शोभायात्रेमध्ये समावेश असणार आहे. तरूणाईचे आकर्षण बाभूळगाव संदल व सुयोग बॅड या शोभायात्रेत राहतील. वरिष्ठ नागरिकांकरिता बसची व्यवस्था राहणार आहे.
नागपूरच्या ऐतिहासिक अशा भोसले घराण्याची तीनशे वर्षे जुनी शोभायात्रा यंदा निघणार आहे. रामनवमी निमित्ताने दरवर्षी ही यात्रा काढण्यात येते. यावर्षीही सिनिअर भोसला पॅलेस येथून दुपारी चार वाजता शोभायात्रा काढली.
श्रीमंत राजे रघुजी भोसले (प्रथम) यांनी १७२५ मध्ये शोभायात्रा सुरवात झाली. ही शोभायात्रा सिनिअर भोसला येथून सुरु होईन कोतवाली चौक, गांधी पुतळा चौक या मार्गाने जात परत बडकस चौक, कोतवाली चौक आणि सिनिअर भोसला पॅलेस येथे परतणार आहे.
यंदा पश्चिम नागपूर नागरिक संघ श्रीराम मंदिरातून शोभायात्रा छोट्या प्रमाणात काढण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kerala Cabinet: मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधीच केरळ मंत्रिमंडळाची घोषणा! काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना संधी; कुणावर कोणती जबाबदारी?

DC vs RR: आधी वैभव सूर्यवंशी अन् परागची वादळी खेळी अन् मग स्टार्कच्या एका ओव्हरने खेळ पालटला; दिल्लीने राजस्थानला २०० च्या आत रोखलं

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

SCROLL FOR NEXT